शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

'पीडितेचे फोटो तात्काल हटवा', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे आदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 22:03 IST

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली.

Kolkata Rape Murder Case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. देशभरातील डॉक्टरांनी निदर्शने करुन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयने मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेतील पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तिचे फोटो तात्काळ हटवण्यास सांगितले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकाता बलात्कार पीडितेचा फोटो सोशल मीडियावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ओळख उघड करणाऱ्या काही मीडिया संस्था आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मीडिया संस्था ज्या प्रकारे पीडितेचे नाव आणि संपूर्ण ओळख उघड करत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयने बंगाल सरकारवर ओढले ताशेरे दरम्यान, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. तसेच महत्त्वाचे अनेक प्रश्न उपस्थित करत त्याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील अनेक मुद्द्यांवर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून चिंताही व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली. शांतताप्रिय आंदोलकांवर सत्ता गाजवू नका. आपण त्यांच्याशी अत्यंत संवेदनशीलतेने वागूया, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला केले आहे. तसेच काही पावले उचलण्यासाठी देश दुसऱ्या अशाच प्रकारच्या घटनेची वाट पाहू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. 

70 डॉक्टरांचे मोंदींना पत्रकोलकातातील सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार व नंतर तिची झालेली हत्या या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, असे पद्म पुरस्कार मिळालेल्या 70 डॉक्टरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा सुनावण्याचा निर्णय विशिष्ट मुदतीत द्या यासह पाच मागण्या या डॉक्टरांनी मोदींकडे केल्या आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगालSocial Mediaसोशल मीडिया