शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात नियमांचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायलयाची केंद्र सरकार, भाजपा, सहा राज्य सरकारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:17 IST

बुरारी मतदारसंघाचे आमदार संजीव झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सर्व प्रतिवादींनी चार आठवड्यांमध्ये आपले उत्तर सादर करावे असे आदेश न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने दिले आहेत.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी आणि सहा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या जाहिरात नियमावलीचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने केंद्र, सहा राज्यांमधील सरकार व भाजपाकडून उत्तर मागितले आहे.नोटीस बजावण्यात आलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगण यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाच्या दिल्लीमधील एका आमदाराने ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये तेलंगण वगळता सर्व राज्ये भाजपाशासित आहेत.

बुरारी मतदारसंघाचे आमदार संजीव झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सर्व प्रतिवादींनी चार आठवड्यांमध्ये आपले उत्तर सादर करावे असे आदेश न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायलायाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरात नियमावलीचे या सरकारांनी उल्लंघन केले आहे असे झा यांनी याचिकेत म्हटले आहे.जाहिरातीसंदर्भात स्थापन केलेल्या समितीने या नियमउल्लंघनाची दखल घ्यावी व योग्य कार्यवाही करावी अशी विनंती झा  यांनी केली आहे. 13 मे 2015 रोजी सर्वोच्च न्यायलयाने जाहिरातींसर्भात नियमावली प्रसिद्ध करुन याबाबत तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. 18 मार्च 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जाहिरातींमध्ये केंद्रीय मंत्री, राज्यपाल, राज्य सरकारच्या मंत्र्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारBJPभाजपा