शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाची 'महिलांच्या मशिद प्रवेशा' वरून केंद्रासह वक्फबोर्डला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 19:54 IST

उच्चशिक्षित मुस्लिम दांपत्याने फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्देमहिला आयोग, अल्पसंख्यांक आयोग, मशिद प्रशासन यांनाही नोटिसाव्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सुनावणी 

पुणे : पुणे येथील उच्चशिक्षित मुस्लिम पती पत्नीने नमाज अदा करण्यासाठी मशिदीत प्रवेश करू देणयाच्या मागणीसाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात दाखल केली होती. याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारसह, वक्फ बोर्ड, महिला आयोग, अल्पसंख्यांक आयोग आणि पुण्यातील ‘त्या ’मशिदीला नोटीस बजावली आहे. 

फराह शेख व अन्वर शेख (रा. दापोडी, पुणे) यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली होती. हे प्रकरण लॉकडाऊनच्या काळात बुधवारी (20 मे) ऑनलाईन पध्दतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली असता याचिका कर्त्यांचे वकील अ‍ॅड. संदीप तिवारी आणि अ‍ॅड. रामेश्वर गोयल यांनी बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी महिलांनी मशिदीत प्रवेश करण्याची आणि नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी म्हणून त्यांनी पुण्यातील मोहमदिया जामा मशिदीतील अधिकार्‍यांना 1 मे 2019 रोजी पत्र लिहिले होते. परंतु, त्यांना त्यांच्या वतीने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मशीदीत महिलांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या मुद्दावरून अखेर ही जनयाचिका दाखल करावी लागली.शेख यांनी त्यांच्या याचिकेमध्ये जगभरातील मशिदींमध्ये महिलांविरूद्ध पूर्वग्रह असलेले कोणतेही कायदे नाहीत. मक्का मशिदीत पुरूष किंवा स्त्री असा लिंगभेद करत नाही. तसेच कॅनडा आणि सौदी अरेबियामधील मशिदीदेखील भेदभाव नाही, असे याचिकेत नमूद केले आहे. तसेच कुराण पुरुष व स्त्री यांच्यात भेद करीत नाही आणि अशी कोणतीही नोंद नसल्याचे त्यानी याचिकेत नमूद केले होते. महिलांनी मशिदीत नमाज अदा करण्यासाठी प्रवेश करण्यास बंदी घालणे हे भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे. महिलांना मशिदीत प्रवेश न देणे म्हणजे राज्यघटनेच्या विविध कलमांन्वये मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. स्त्रियांना उपासनेचे हक्क नाकारण्यासाठी धर्म हा आवरण म्हणून वापरला जाऊ शकत नाही आणि ते मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे याचिकेत म्हटले होते. दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार, राज्यसरकार, वक्फ बोर्ड आणि अखिल भारतीय मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळ, अखिल पुणे बोपोडी येथील मुहमादिया जमातुल मुस्लिमिन मशिदीचे अध्यक्ष आणि सचिव यांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी 6 जुलैपर्यंत म्हणणे सादर करावे लागणार असल्याचे याचिकाकर्त्याचे पती अन्वर शेख यांनी सांगितले.

.......................................

 .. अशी झाली ऑनलाईन सुनावणीसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू असून सध्या सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे महत्वाच्या प्रकरणांवर सुनावण्या घेतल्या जात आहे. पुण्यातील याचिकाकर्त्यांने सर्वोच्च न्यायालयात महिलांच्या प्रवेशाबाबतची याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी ऑनलाईन बुधवारी ठेवण्यात आली होती. सुनावणी पुर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टार यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना लिंक पाठवली. त्यानंतर वकिलांनी आपले वादी शेख यांना संबंधीत लिंक पाठवून खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्याबाबत सांगितले. त्यानुसार याचिकाकर्ते फराह शेख, अन्वर शेख, अ‍ॅड. तिवारी, अ‍ॅड. गोयल सुनावणीस घरातील लॅपटॉपवरूनच ऑनलाईन पध्दतीने हजर झाले. तिवारी यांनी याचिकेतील मुद्दे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडले. त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून सर्व प्रतिवादींना नोटीसा बजावण्याचे आदेश दिले.

 

टॅग्स :PuneपुणेMuslimमुस्लीमWomenमहिलाCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय