शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा सचिवांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; अवमान कारवाई का करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:31 IST

Supreme Court notice to Assembly Secretary : हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राचा सूर धमकीवजा आहे असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

नवी दिल्ली : विधानसभा हक्कभंग प्रकरणी पाठविलेली नोटीस सर्वोच्च न्यायालयाला सादर करून सभागृह कामकाजाच्या गोपनीयतेचा भंग केला आहे असे पत्र रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पाठविल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांवर अवमान कारवाई का सुरू करण्यात येऊ नये अशी नोटीस त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बजावली आहे. या नोटीसीचे दोन आठवड्यांत उत्तर द्यावे असा आदेश न्यायालयाने दिला आहे. हक्कभंग प्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्राचा सूर धमकीवजा आहे असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. विधानसभा हक्कभंग प्रकरणी अटक करण्यापासून अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने संरक्षण दिले आहे. महाराष्ट्र विधानसभा सचिवांनी गोस्वामी यांना १३ ऑक्टोबर रोजी पाठविलेल्या पत्राची सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. अर्णब गोस्वामी यांची बाजू प्रख्यात विधीज्ञ हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज गोपनीय असून ते उघड करता कामा नये असे महाराष्ट्र विधानसभा सचिवांनी अर्णब गोस्वामी यांना पत्रात लिहिले होते. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत खंडपीठाने म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा सचिवांनी पत्रात जी विधाने केली आहेत, त्याकडे न्याययंत्रणेच्या कामात थेट हस्तक्षेप करण्याचा प्रकार म्हणूनही पाहिले जाऊ शकते. 

दिलासा नाहीचवास्तुविशारदाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आणि त्या प्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पूर्ण न झाल्याने उच्च न्यायालयाने शनिवारी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अर्णब यांना दुसऱ्या दिवशीही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. शनिवारी यावर सुनावणी घेऊ, असे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. 

हा तर मूलभूत अधिकारकोणत्याही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार राज्यघटनेच्या ३२व्या कलमाद्वारे नागरिकांना मिळाला आहे. तो मूलभूत अधिकार आहे. या बाबी महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांनी लक्षात घ्याव्यात असेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.

तिसरी रात्रही काेठडीतवास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना बुधवारी त्यांच्या परळ येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अलिबाग दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली. सध्या अर्णब यांना अलिबागच्या एका शाळेत ठेवले आहे. अलिबाग कारागृहाचे त्या शाळेत कोरोना सेंटर आहे. 

अधिकारांचा गैरवापरगोस्वामी यांच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारने अधिकारांचा गैरवापर केला. गाेस्वामी यांच्यावर अनेक गुन्हे नोंदविले आहेत. २०१८ च्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी मुद्दाम गाेस्वामी यांना आता अटक केली. कारण त्यांना माहीत आहे की, उच्च न्यायालयाला आता दिवाळीची सुट्टी सुरू होईल. 

अटक बेकायदा : साळवेराज्य सरकारला त्यांना धडा शिकवायचा आहे. अलिबाग मुख्य दंडाधिकारी न्यायालयानेही त्यांना केलेली अटक सकृतदर्शनी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी केस पुन्हा उघडण्यापूर्वी परवानगी घेतली नाही. अशा स्थितीत गाेस्वामी यांना कारागृहात राहण्याची आवश्यकता नाही, असेही साळवे म्हणाले. या याचिकेवर शनिवारी सुनावणी घेण्यात येईल. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयvidhan sabhaविधानसभाarnab goswamiअर्णब गोस्वामी