नवी दिल्ली : न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या सेवाज्येष्ठतेवरून उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तीन न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती जोसोफ यांच्यासह न्या. विनीत सरन आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांनी ही शपथ घेतली. केंद्र सरकारने न्या. जोसेफ यांची सेवाज्येष्ठता घटविल्याने वाद निर्माण झाला होता. जोसेफ यांना यादीमध्ये तिसरे स्थान देण्यात आल्याने नाराज झालेल्या न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर केंद्र सरकारने क्रमानुसारच शपथिवधी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.
न्यायमूर्ती जोसेफ यांनी घेतली तिसऱ्या क्रमांकावरच शपथ, अन्य दाेन न्यायाधीश शपथबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 13:58 IST