शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:00 IST

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांनी गेल्या महिनाभरात दिलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत आले असून, सरन्यायाधीश भूषण गवई यांना या प्रकरणांत हस्तक्षेप करावा लागला आहे.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांनी गेल्या महिनाभरात दिलेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत आले असून, सरन्यायाधीश भूषण गवई यांना या प्रकरणांत हस्तक्षेप करावा लागला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयावर टीका, भटक्या कुत्र्यांबाबत आदेश आणि हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलन याप्रकरणी सरन्यायाधीशांना हस्तक्षेप करावा लागला.  

अलाहाबाद उच्च न्यायालयावर टीकापारडीवाला यांनी एका दिवाणी प्रकरणात फौजदारी कारवाईस परवानगी देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्यावर टीका केली होती आणि त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कोणतेही फौजदारी प्रकरण न देण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठ न्यायमूर्तींनी या आदेशावर नाराजी व्यक्त केल्यानंतर सरन्यायाधीश गवई यांनी हस्तक्षेप करत पारडीवाला यांना त्यांच्या टिप्पणींचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते.

हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलन  २८ जुलै रोजी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हिमाचल प्रदेशातील पर्यावरणीय असंतुलनावर गंभीर निरीक्षण नोंदवत परिस्थिती बदलली नाही तर संपूर्ण राज्य ‘हवेत गायब’ होऊ शकते, असा इशारा दिला.  त्यांनी महसूल कमाईपेक्षा पर्यावरण व पारिस्थितिक संतुलनाला प्राधान्य द्यावे, असे केंद्र व राज्य सरकारांना सुचवले होते. हे प्रकरणही आता न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. 

भटक्या कुत्र्यांबाबत आदेश पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधत दिल्ली-एनसीआर प्रशासनाला सर्व भटके कुत्रे तातडीने पकडून आश्रयस्थळी हलवण्याचे निर्देश दिले होते. या आदेशावर पशुप्रेमी व संस्थांकडून टीका झाल्यानंतर प्रकरण न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सोपवण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी या खंडपीठाने आदेशात बदल करून, कुत्र्यांचे नसबंदी व लसीकरण केल्यानंतर त्यांना परत त्याच भागात सोडण्याचा आदेश दिला.

सरन्यायाधीशपदाच्या रांगेत१२ ऑगस्ट १९६५ रोजी मुंबईत जन्मलेले पारडीवाला हे वलसाड (गुजरात) येथील असून, त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य वकिली व्यवसायाशी संबंधित आहेत. पारडीवाला यांची २०११ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली व २०१३ मध्ये स्थायी न्यायमूर्तिपद मिळाले. ९ मे २०२२ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. मे २०२८ मध्ये ते भारताचे सरन्यायाधीश होण्याच्या रांगेत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय