शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख दंड भरा, दिवसभर कोर्टात उभे राहा; माजी सीबीआय प्रमुखांना 'सर्वोच्च' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 12:44 IST

सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्यानं नागेश्वर राव यांना दणका  

नवी दिल्ली: मुझफ्फरपूर निवारागृह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना दणका दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल राव यांनी माफी मागितली होती. मात्र ती न्यायालयानं अमान्य केली. याशिवाय न्यायालयानं त्यांना 1 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले. इतकंच नव्हे, तर राव यांना दिवसभराचं कामकाज होईपर्यंत न्यायालयात उभं राहण्याची शिक्षादेखील करण्यात आली. यामुळे राव यांच्यासह मोदी सरकारलादेखील दणका बसला आहे. आलोक वर्मा आणि राकेश वर्मा या सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमधील वाद समोर आल्यानंतर मोदी सरकारनं राव यांची सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून नियुक्ती केली होती. मुझफ्फरपूर निवारागृह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय केली जाऊ नये, अशा सूचना राव यांना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही राव यांनी तपास पथकाचे प्रमुख असलेल्या ए. के. शर्मा यांची 17 जानेवारीला सीआरपीएफमध्ये बदली केली. यानंतर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी काल राव यांनी बिनशर्त माफी मागितली होती. या प्रकरणात अ‍ॅटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी राव यांची बाजू मांडली. राव यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. त्यांनी जाणूनबुजून ही चूक केली नाही. अनावधानानं त्यांच्या हातून ही चूक झाली, असा युक्तीवाद वेणुगोपाल यांनी केला. यावर न्यायालयाचा अपमान करणाऱ्या आरोपीचा बचाव सरकारी पैशातून का केला जात आहे, असा प्रश्न सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारला. वेणुगोपाल यांच्या युक्तीवादाबद्दल सरन्यायाधीशांनी नाराजीदेखील व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती असल्यानं राव यांनी कायदे विभागाचा सल्ला मागितला होता. शर्मा यांची बदली करण्याआधी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करुन परवानगी घ्या, अशी सूचना राव यांना कायदेशीर सल्लागारानं दिला होता. मात्र तरीही त्यांनी न्यायालयाची परवानगी घेतली नाही,' असं गोगोई म्हणाले. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय