नन बलात्कारप्रकरणी सुनावणीस तयार- सुप्रीम कोर्ट याचिका दाखल करा : लीली थॉमस यांच्या विनंतीची दखल
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
नवी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिली.

नन बलात्कारप्रकरणी सुनावणीस तयार- सुप्रीम कोर्ट याचिका दाखल करा : लीली थॉमस यांच्या विनंतीची दखल
न ी दिल्ली : प. बंगालमधील ७१ वर्षीय ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी याचिका दाखल केली जात असल्यास सुनावणी करण्याची तयारी सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी दर्शविली. स्वत:हून दखल घेण्याचे टाळत एका महिला वकिलाला याचिका दाखल करण्याची परवानगीही सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठाने दिली.तुम्ही याचिका दाखल करा, आम्ही त्यावर सुनावणी करू असे खंडपीठाने स्पष्ट केले. वकील लीली थॉमस यांनी मौखिक विनंती करताना सवार्ेच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी, असे सुचविले होते. याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले जाईल. दरम्यान थॉमस यांनी याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प. बंगालच्या नादिया जिल्ह्यात १४ मार्च रोजी वयोवृद्ध ननवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून आरोपींना अटक होऊ शकलेली नाही. या घटनेबद्दल देशभरात रोष व्यक्त होत असून संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते.