शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 20:19 IST

अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे

दिल्ली - अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मस्जिद विवादीत जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावे की नाही यावर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे. मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा असा सल्ला दिला होता. चर्चा करून यावर तोडगा निघत असेल तर तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे. बुधवारी सुप्रीम कोर्ट दोन्ही पक्षकारांना आपली मते मांडण्याची संधी देऊन हे प्रकरण मध्यस्थाकडे पाठवावे की नाही यावर निर्णय देणार आहे. 

दरम्यान मुस्लिम पक्षकारांच्या वकीलांनी चर्चेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात मात्र हिंदू पक्षकारांच्या वकीलांना असा प्रयत्न याआधीही करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे मध्यस्थी करण्याची शक्यता फार कमी वाटते. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की  मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो त्याचा आम्ही विरोध करणार नाही मात्र रामलल्लाचे वकील सीएस वैघनाथन यांनी याचा विरोध करत याआधीही मध्यस्थी करून अयोध्या प्रश्नी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो अयशस्वी झाला असल्याचे सांगितले. 

तसेच याबाबत अन्य हिंदु पक्षकारांचे वकील रंजीत कुमार यांनी विवादीत प्रकरणावर मध्यस्थी करण्याची भूमिकेची शक्यता नसून सुप्रीम कोर्टाने पुढे सुनावणी सुरू ठेवली पाहिजे अशी भूमिका घेतली. वैघनाथन यांनी सांगितले की विवादीत जागा ही रामजन्म भूमी आहे त्यावर मध्यस्थी होऊच शकत नाही यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले होते की, पक्षकारांच्या मर्जीच्या विरोधात कोणाताही निर्णय घेतला जाणार नाही पुढील सुनावणी वेळी दोन्ही पक्षकारांनी या प्रकरणावर कसा तोडगा काढला जाऊ शकतो याबाबत सुप्रीम कोर्टात माहिती द्यावी. त्यामुळे उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHinduहिंदूMuslimमुस्लीम