शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालाच्या निकषांची माहिती दोन आठवड्यांत द्या- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:01 IST

परीक्षा रद्द केल्याबद्दल व्यक्त केला आनंद

नवी दिल्ली : बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करणार, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल? याची माहिती दोन आठवड्यांच्या आत सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई व आयसीएसईला दिला आहे. कोरोना साथीमुळे यंदा सीबीएसईची बारावीची परीक्षा न घेण्याच्या केंद्राने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला. बारावीचे निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करायचे याची माहिती सादर करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने गुण द्यावेत याची पद्धती ठरविण्यासाठी कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स या संस्थेने चार आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र, त्यामुळे विदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयएससीईची विनंती सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील व न्या. दिनेश महेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने अमान्य केली.  विविध राज्यांतील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा रद्द केली असून, त्यामुळे १.२ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. आधी बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या पद्धतीने लावायचे, हा प्रश्न सोडविला जाईल. सर्वांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दोन आठवड्यांनी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले आहे. केंद्रातर्फे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सीआयएससीईचे वकील जे. के. दास यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय