शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

SBI ला सर्वोच्च न्यायालयाचा झटका, ऑनलाइन फसवणूक प्रकरणात ठोठावला ₹ 94 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:50 IST

SBI विरोधात सर्वोच्च न्यायालयात कोणी याचिका दाखल केली? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या...

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात SBI फटकारले आणि 94 हजार रुपये भरण्याचे आदेशी दिले. एसबीआयला सर्वोच्च न्यायालयाने फटकारण्याचे कारण काय? का 94,000 रुपये द्यायला सांगितले? SBI विरोधात सर्वोच्च न्यायालयात कोणी याचिका दाखल केली? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? सविस्तर जाणून घ्या...

नेमकं काय घडलं?आसाममधील एका व्यक्तीची ही गोष्ट आहे. 2021 मध्ये या व्यक्तीने लुई फिलिप कंपनीचे ब्लेझर विकत घेतले होते. यानंतर त्याला ते आवडत नसल्याने परत करण्याचा विचार केला. त्यावेळी लुई फिलिपची वेबसाईट हॅक झाली आणि ऑनलाईन स्कॅम करणाऱ्याने या व्यक्तीशी संपर्क साधला आणि स्वत:ची ओळख लुई फिलिपचे प्रतिनिधी म्हणून करुन दिली. फोनवर ॲप इन्स्टॉल केले असेल तरच ब्लेझर परत करता येईल, असे त्याने सांगितले. हे ॲप इन्स्टॉल होताच फसवणूक करणाऱ्याने त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे केले.

त्या व्यक्तीने तत्काळ SBI च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. एसबीआयने त्याची माहिती घेतली आणि कार्ड-अकाउंट ब्लॉक केले. यानंतर त्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. आसाम पोलिसांच्या सायबर क्राइम सेलमध्ये तीन तक्रारी केल्या. मदत न मिळाल्याने त्या व्यक्तीने आधी आरबीआय लोकपाल आणि नंतर गुवाहाटी उच्च न्यायालयात आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला.

SBI ने कोणतेही पाऊल उचलले नाहीरक्कम मोठी होती, पण SBI ने ना सायबर गुन्ह्याची तक्रार केली, ना चार्जबॅकची विनंती केली. उलट ग्राहकावरच हलगर्जीपणाचा आरोप केला. एवढंच नाही, तर गुगल पेच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे एसबीआयने म्हटले. एसबीआयने सर्व जबाबदार झटकून टाकली. 

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?यानंतर त्या व्यक्तीने एसबीआयविरुद्ध आरबीआय बँकिंग लोकपाल, गुवाहाटी उच्च न्यायालयात आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात खटलाही दाखल केला. आरबीआय लोकपालाकडून पराभूत झाल्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला. तसेच एसबीआयला 94,000 रुपये पूर्ण भरण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, SBI कडे सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे, तरीही सायबर फसवणूक रोखण्यात अपयश आले. पीडित व्यक्तीने 24 तासांच्या आत फसवणुकीची माहिती एसबीआयला दिली. त्यामुळे बँकेने तातडीने कारवाई करायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले.

टॅग्स :SBIएसबीआयcyber crimeसायबर क्राइमAssamआसामCrime Newsगुन्हेगारी