शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एआयने बनविलेल्या याचिका पाहून सर्वोच्च न्यायालय वैतागले; असे ना संदर्भ, ना खटले कधी अस्तित्वात होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:04 IST

AI generated petitions Supreme Court : वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात एआयद्वारे तयार केलेल्या याचिका आणि बनावट निकालांचे दाखले सादर केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलांना फटकारले. वाचा काय घडले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्या खाणार असा फुगा सगळीकडे फुगवला जात आहे. परंतू, हेच एआय किती धोकादायक आणि अविश्वासार्ह आहे हे खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच उघड केले आहे. वकिलांनी एआयच्या मदतीने तयार केलेल्या याचिकांमध्ये कधीही न दिलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या निकालांचे दाखले दिल्याचे समोर आले आहे.

काही महिन्यांपूर्वी एआयच्या मदतीने वकिलीची परीक्षेची तयारी केल्याचे आणि पासही झाल्याचे वृत्त आले होते. परंतू, याच एआयच्या वाढत्या गैरवापरामुळे आता थेट सर्वोच्च न्यायालयही चिंतेत पडले आहे. या गंभीर प्रकारामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे नेमका प्रकार?सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान चॅटजीपीटी  किंवा तत्सम एआय टूल्सचा वापर करून याचिका तयार केल्याचे उघड झाले. या याचिकांमध्ये अशा काही निकालांचा संदर्भ देण्यात आला होता, जे प्रत्यक्षात कधीच देण्यात आले नव्हते. यावर भाष्य करताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "काही वकिलांनी एआयचा वापर करून मसुदा तयार करणे सुरू केले आहे, हे पाहून आम्ही चिंतेत आहोत. हे अत्यंत चुकीचे आहे."

जस्टिस नागरत्ना यांचा धक्कादायक अनुभवखंडपीठातील सदस्य जस्टिस बी.व्ही. नागरत्ना यांनी सांगितले की, त्यांना नुकताच एका निकालात 'मर्सी व्हर्सेस मॅनकाइंड' या केसचा दाखला मिळाला, जो प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. काही प्रकरणांत केसचा संदर्भ बरोबर असतो, मात्र त्यातील जे 'कोट' दिले जाते ते पूर्णपणे बनावट असते. यामुळे न्यायाधीशांच्या कामाचा ताण प्रचंड वाढत आहे, कारण त्यांना प्रत्येक दाखल्याची सत्यता पुन्हा तपासावी लागते.

मसुदा तयार करण्याच्या कलेचा ऱ्हासजस्टिस जॉयमाल्या बागची यांनी यावर चिंता व्यक्त करताना सांगितले की, सध्या लीगल ड्राफ्टिंगच्या कलेचा ऱ्हास होत आहे. त्यांनी जुन्या काळातील अशोक कुमार सेन यांच्यासारख्या दिग्गज वकिलांची आठवण काढली, ज्यांचे मसुदे नेमके आणि मूळ तेवढेच असायचे. केवळ याचिका मोठी करण्यासाठी जुन्या निकालांचे चुकीचे दाखले भरणे हे न्यायव्यवस्थेसाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अलीकडेच बॉम्बे हायकोर्टानेही अशाच प्रकारे एआयद्वारे तयार केलेले बनावट दाखले वापरल्याबद्दल एका याचिकाकर्त्यावर मोठा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता वकिलांना एआयचा वापर करताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court frustrated with AI-generated petitions citing nonexistent cases.

Web Summary : Supreme Court expresses concern over lawyers using AI to draft petitions. These petitions include references to nonexistent cases, increasing workload for judges. Concerns raised about declining legal drafting skills and misuse of AI in justice system.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स