शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 08:47 IST

Supreme Court: स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असे कोर्टाचे म्हटले आहे. रस्ता अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या पालकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

१८ जून २०१४ रोजी, एनएस रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मिडिया रिपोर्टनुसार, रवीश वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला. मल्लासंद्रा गावापासून अरासीकेरेदरम्यान हा अपघात झाला.

 या अपघातात रवीश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रविशची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे ८० लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हा बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले. मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीशच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला. 

नंतर, त्यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आणि दावा केला की हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. यावर हायकोर्टाने म्हटले की, "मृत व्यक्तीच्या कायदेशीर प्रतिनिधीच्या वतीने दावा केला जातो, तेव्हा हे सिद्ध करणे आवश्यक आहे की मृत व्यक्ती निष्काळजीपणे गाडी चालवण्यास जबाबदार नाही. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला आणि त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत."

सुप्रीम कोर्टाचा कुटुंबियांना दिलासा देण्यास नकारन्यायाधीश पीएस नरसिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन या याचिकेवर सुनावणी केली. त्यांनी मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की,  स्वत: चुकीमुळे अपघात होतो, तेव्हा मृताचे कुटुंबीय विमान कंपनीकडे भरपाई मागू शकत नाहीत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatakकर्नाटकAccidentअपघात