Supreme Court CJI BR Gavai :सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. एका 71 वर्षीय ज्येष्ठ वकिलाने भारताचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुनावणीदरम्यान घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशासह न्यायव्यवस्थेला हादरवून टाकले आहे. सरन्यायाधीशांनी खजुराहोतील भगवान विष्णुच्या मूर्तीबाबत केलेल्या टिप्पणीमुळे संबंधित वकील नाराज होते. यामुळेच त्यांनी गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, त्या घटनेच्या तीन दिवसांनंतर सरन्यायाधीशांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान गवई म्हणाले की, “सोमवारी जे घडले, त्याने आम्ही सगळेच काही काळ स्तब्ध झालो होतो. मात्र आता तो आमच्यासाठी एक संपलेला धडा आहे.”
इतर न्यायमूर्तींची प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेवर न्यायमूर्ती उज्जल भुईयां यांनी कठोर भाष्य करताना म्हटले की, “ते देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, हा काही विनोदाचा विषय नाही. ही घटना केवळ व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण संस्थेवर प्रहार आहे.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही टिप्पणी करताना म्हटले की, “ही घटना अक्षम्य आहे. मात्र न्यायालयाने दाखवलेले संयम आणि उदारता प्रेरणादायक आहे.”
आरोपी वकीलावर कारवाई
घटनेनंतर लगेचच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) ने संबंधित वकील राकेश किशोर यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द केले आहे. याशिवाय, बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने त्यांचा वकिलीचा परवानादेखील निलंबित केला आहे. दरम्यान, या घटनेवरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरुन एकमेकांवर निशाणा साधत आहेत.
Web Summary : CJI Gavai addressed the shoe-throwing incident, calling it a closed chapter. A lawyer threw a shoe at him, reportedly upset by his remarks. The Bar Council suspended the lawyer's license. Other judges condemned the act.
Web Summary : सीजेआई गवई ने जूता फेंकने की घटना पर प्रतिक्रिया दी, इसे एक भूला हुआ अध्याय बताया। एक वकील ने कथित तौर पर उनकी टिप्पणियों से नाराज़ होकर उन पर जूता फेंका। बार काउंसिल ने वकील का लाइसेंस निलंबित कर दिया। अन्य न्यायाधीशों ने इस कृत्य की निंदा की।