शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Aadhar Verdict: 'या' दोन मराठी न्यायाधीशांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला 'आधार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 13:20 IST

Aadhar Verdict Update: आधार वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला

नवी दिल्ली: आधार कार्ड वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठात चार न्यायमूर्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे यातील दोन न्यायाधीश हे मराठी आहेत. दीपक मिश्रा:आधार कार्ड वैध असल्याचा निर्णय देणाऱ्या घटनापीठाचं अध्यक्षपद दीपक मिश्रांकडे होतं. 27 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. खेहर निवृत्त झाले. यानंतर मिश्रा यांनी सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळली. ते देशाचे 45 वे सरन्यायाधीश आहेत. मिश्रा 2 ऑक्टोबर 2018 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिले. यामध्ये समलैंगिकता आणि आधार कार्डच्या वैधतेचा समावेश आहे. याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये आणखी महत्त्वपूर्ण निकाल दिले जाणार आहेत. ए. एम. खानविलकर: अजय माणिकराव खानविलकर यांनी याआधी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. 29 मार्च 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. यानंतर त्यांच्याकडे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर 2013 मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. 13 मे 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. डी. वाय. चंद्रचूड: धनंजय यशवंत चंद्रचूड यांची 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे. परदेशात शिक्षण घेतलेल्या चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्यांची कारकीर्द सुरू केली. यानंतर त्यांची देशाच्या अतिरिक्त महाधिवक्तेपदी नेमणूक झाली. त्यांनी अलाहाबादचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलं. यानंतर 2016 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. याशिवाय या घटनापीठात न्यायमूर्ती अशोक भूषण आणि अर्जन कुमार सिकरी यांचाही समावेश होता. त्यांनीही या निकालात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय