उपोषणास बसलेल्या कपिल मिश्रांवर आप समर्थकाचा हल्ला
By Admin | Updated: May 10, 2017 18:24 IST2017-05-10T18:17:34+5:302017-05-10T18:24:50+5:30
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उपोषणास बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला

उपोषणास बसलेल्या कपिल मिश्रांवर आप समर्थकाचा हल्ला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उपोषणास बसलेले आमदार कपिल मिश्रा यांच्यावर हल्ला झाला आहे. आज संध्याकाळी आम आदमी पक्षाचा समर्थक असलेल्या अंकित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने कपिल मिश्रांवर हल्ला केला आहे.
या हल्ल्याबाबत कपिल मिश्रा म्हणाले, "एक हल्लेखोर आरडाओरड करत माझ्याकडे आला. त्याचा हेतू चांगला दिसत नव्हता. तुला सोडणार नाही, असे म्हणत त्याने माझ्यावर हल्ला केला." तर कपिल मिश्रा यांनी पक्षविरोधी काम केले आहे. मी स्वत:च येथे आलो आहे. मला कुणीही पाठवलेले नाही, असे या हल्लेखोराने म्हटले आहे.
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री असलेल्या कपिल मिश्रा यांची केजरीवाल यांनी शनिवारी सरकारमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मिश्रा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उभारत केजरीवाल यांनी सत्येंद्र मिश्रा यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत मिश्रा यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही दाखल केली होती.
Delhi: Kapil Mishra who is sitting on a "Satyagraha" attacked by a person named Ankit Bhardwaj pic.twitter.com/YlI308p6g7
— ANI (@ANI_news) May 10, 2017