कुरेशी समाजाचे धरणे आंदोलन विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा
By Admin | Updated: February 13, 2015 00:49 IST2015-02-13T00:38:29+5:302015-02-13T00:49:31+5:30
लातूर : लातूर जिल्ातील लहान-मोठ्या कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण, कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, गोवंश हत्याबंदी विधेयक बिल तात्काळ रद्द करावे, यासह काही संघटनांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा जमिअतुल कुरैशच्या वतीने गांधी चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

कुरेशी समाजाचे धरणे आंदोलन विविध पक्ष-संघटनांचा पाठिंबा
लातूर : लातूर जिल्ातील लहान-मोठ्या कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण, कुरेशी समाजाला जातीचे प्रमाणपत्र, गोवंश हत्याबंदी विधेयक बिल तात्काळ रद्द करावे, यासह काही संघटनांकडून होणारा त्रास थांबविण्यात यावा, या मागणीसाठी लातूर जिल्हा जमिअतुल कुरैशच्या वतीने गांधी चौकात गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने जाणीवपूर्वक काही समाजकंटकांकडून बाजारात त्रास दिला जात आहे. जनावरे खरेदी केल्यावर वाहतूक करण्यासाठी अडवणूक केली जाते. पोलिसात खोट्या तक्रारी दिल्या जातात. मारहाण केली जाते. पैसे काढून घेतले जातात, असे प्रकार सर्रासपणे वाढत असल्याने कुरेशी समाजाने ५ फेब्रुवारीपासून बेमुदत कत्तलखाने बंद केले आहेत. सवार्ेच्च न्यायालयाने आदेश देऊनही कत्तलखान्यांचे आधुनिकीकरण केले जात नाही. सत्ताबदल झाल्याने जातीयवादी अतिउत्साही संघटनांनी उच्छाद मांडला आहे. प्रशासन गप्प आहे. जनावरांची वाहने अडवून खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत दोनशे जनावरे परत मिळालेली नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला.
न्यायमूर्ती सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा समितीच्या शिफारशी लागू करून मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, खाटिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, हिंदू खाटिकप्रमाणे मुस्लिम कुरेशी (खाटिक) समाजाला सवलती देण्यात याव्यात, आदी मागण्या जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
तर त्यांचा आम्हीच बंदोबस्त करू...
जमिअतुल कुरैशच्या आंदोलनाला लातूर, औसा, देवणी, निलंगा, जळकोट, उदगीर, रेणापूर, अहमदपूर, चाकूर आदी भागातून पाठिंबा मिळाला. यावेळी महापौर अख्तर शेख, भाजपाचे मोहन माने, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, मिलिंद महालिंगे, प्रा. अनंत लांडगे, लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. आण्णाराव पाटील, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंतअप्पा उबाळे, ब्लू पँथरचे अध्यक्ष साधू गायकवाड, लष्कर-ए-भिमाचे रणधीर सुरवसे, मिलिंद कांबळे, मुस्लिम क्रांती सेनेचे हमिदखाँ पठाण, मोटारमालक संघाचे अध्यक्ष सय्यद ताजोद्दीनबाबा आदींची भाषणे झाली. हिंदू खाटिक राज्य मागासवर्गीय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, मुव्हमेंट पीस फॉर जस्टिस, लातूर जिल्हा चिकन व्यापारी असोसिएशन, स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट आदी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी हाफी इब्राहीम कुरेशी, अफजल कुरेशी, अफसर कुरेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.