इसिसच्या समर्थकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
By Admin | Updated: January 25, 2016 15:23 IST2016-01-25T15:23:56+5:302016-01-25T15:23:56+5:30
इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करून त्यावर ISIS रंगवण्याचा निंदनीय प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.

इसिसच्या समर्थकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. २५ - इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करून त्यावर ISIS रंगवण्याचा निंदनीय प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे.
राजस्थानात दुदू येथे महात्मा गांधींचा पुतळा असून या पुतळ्याची विटंबना झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. प्रजासत्ताक दिनी भारतात घातपात घडवण्याची इस्लामिक स्टेटची योजना असल्याचे समजल्यावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी जवळपास १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे.
राजधानी दिल्लीसह देशभरात हाय अॅलर्ट देण्यात आला असून प्रजासत्ताक दिन शांततेत व कुठलाही अनुचित प्रकाराविना पार पडावा अशी अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना व्हावी आणि तिदेखील इस्लामिक स्टेटचे भ्याड समर्थन करत, ही चिंतेची बाब मानण्यात येत आहे.
Mahatma Gandhi's statue defaced in Dudu (Rajasthan), 'ISIS zindabad' scribbled on it. pic.twitter.com/mH6H3fRzfP
— ANI (@ANI_news) January 25, 2016