रेशनकार्ड धारकाकडून घेणार आधार, बँंक खाते क्रमांक
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:33+5:302015-01-22T00:07:33+5:30
नागपूर: एलपीजी गॅस ग्राहकांना आधार कार्डशी लिंक केल्यानंतर याच धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांकडून त्यांचा आधार क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक घेण्यात येणार आहे.

रेशनकार्ड धारकाकडून घेणार आधार, बँंक खाते क्रमांक
न गपूर: एलपीजी गॅस ग्राहकांना आधार कार्डशी लिंक केल्यानंतर याच धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांकडून त्यांचा आधार क्रमांक आणि बँक खात्याचा क्रमांक घेण्यात येणार आहे. सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणा दिवसेंदिवस अधिक पारदर्शक करून यातील गैरव्यवहार कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बोगस रेशनकार्ड धारकांना हुडकून खऱ्या लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यावर शासकीय यंत्रणेचा भर आहे. या प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे.दारिद्र्य रेषेखालील आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थी रेशनकार्ड धारकांकडून त्यांच्या आधार कार्ड आणि बँक खात्याचा क्रमांक घेतला जाणार आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात देण्याची सोय असेल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी शंभर रुपये जमा केले जाणार आहे. जिल्ह्यात २ लाख ३३ हजारांवर या लाभार्थ्यांची संख्या आहे. या मोहिमेतून पुरवठा विभागाकडे लाभार्थ्यांच्या आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती प्राप्त होईल. या माहितीचा उपयोग पुढच्या काळात ही यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यासाठी केला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)