वृद्धापकाळात मिळाला आधार

By Admin | Updated: October 31, 2015 22:45 IST2015-10-31T22:45:03+5:302015-10-31T22:45:03+5:30

जळगाव : सिंधी समाजातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना पूज्य सेवा मंडळातील वृद्धाश्रमाद्वारे आधार मिळत आहे. वृद्धांना त्यांच्या उतारवयात अधिकाधिक आनंद मिळाला पाहिजे, यादृष्टीने पूज्य सेवा मंडळाचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेताहेत. तसेच सिंधी समाजातीलच काही तरुण मुलेही ज्येष्ठांची सेवा मोठ्या आनंदाने करत असून त्यांचे कृपाआशीर्वाद मिळविताना दिसत आहेत.

Support for old age | वृद्धापकाळात मिळाला आधार

वृद्धापकाळात मिळाला आधार

गाव : सिंधी समाजातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना पूज्य सेवा मंडळातील वृद्धाश्रमाद्वारे आधार मिळत आहे. वृद्धांना त्यांच्या उतारवयात अधिकाधिक आनंद मिळाला पाहिजे, यादृष्टीने पूज्य सेवा मंडळाचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेताहेत. तसेच सिंधी समाजातीलच काही तरुण मुलेही ज्येष्ठांची सेवा मोठ्या आनंदाने करत असून त्यांचे कृपाआशीर्वाद मिळविताना दिसत आहेत.
म्हातारपणं आलं म्हणजे चिडचिड होणे स्वाभाविक आहे. याच वयात विविध आजारांनी तोंड वर काढणे, किंबहुना जुन्या व नवीन पिढीच्या विचारात भिन्नता आढळून येते. त्यामुळे आज अनेक घरांमधील ज्येष्ठ आई व वडील आश्रार आश्रमात राहण्याचा निर्णय घेतात. त्यादृष्टीने पूज्य सेवा मंडळातर्फे अशा वयोवृद्धांना आधार देण्याचे काम अनेक वर्षापासून केले जात आहे. सद्य:स्थितीत येथील वृद्धाश्रमात १०० वृद्ध महिला व पुरुष आश्रय घेत आहेत.
मदतीला सरसावले तरुण
आधार आश्रमात राहणार्‍या अनेक वृद्धांनी वयाची पंचात्तरी ओलांडली आहे. काहींना चालायला अडचण होते. येवढेच काय तर नैसर्गिक विधीसाठी जातानाही काहींना शारीरिक कळा सहन कराव्या लागतात. अशा परिस्थिती वृद्धांचे हेच दु:ख झेलण्यासाठी सिंधी समाजातील १७ ते २५ वयोगटांतील तरुण वर्ग सरसावला आहे. वर्षभर सेवा मंडलात जाऊन वृद्धांना पाहिजे, ती मदत करताना ही तरुण मुले दिसतात. बाथरूमला जाताना किंवा बाहेर फिरण्यासाठी वृद्ध निघाल्यानंतर त्यांच्याकडे काठीचा आधार असतानाही ते तरुणांची मदत घेतात. तरुणांनी हात धरल्यानंतर तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून सर्वांना क्षणिक का होईना? गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.
मोफत औषधोपचार
पूज्य सेवा मंडलात वयोवृद्धांवर औषधोपचार व्हावेत, या उद्देशाने यासाठी पूज्य सेवा मंडळात असलेल्या दवाखान्यातून वयोवृद्धांवर मोफत औषधोपचार केले जातात. गंभीर अवस्थेतील रुग्णाला बाहेरील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही येणारा खर्च मंडळातर्फे केला जातो.
निराशा झटकून वयोवृद्धांचा सेवेचा प्रयत्न
पदरी जी निराशा पडली आहे. त्याचा विचार न करता, संत बाबा हरदासराम मंदिर परिसरात अनेक वयोवृद्ध स्वच्छता करणे, कचरा वेचणे, स्वयंपाकाच्या ठिकाणी मदत करणे किंवा त्यांच्याकडून जे शक्य होईल, ते काम करतात.
वेळपत्रकानुसार चालते कामकाज
सकाळी नऊ वाजता वयोवृद्ध व्यक्तींना चहा, कॉफी व नाश्ता दिला जातो. दुपारी दीड वाजता व रात्री आठ वाजता जेवण दिले जाते.

(फोटो आहे)


Web Title: Support for old age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.