लष्करी कारवाईचे उद्योगजगताकडून समर्थन
By Admin | Updated: September 29, 2016 18:24 IST2016-09-29T18:08:19+5:302016-09-29T18:24:39+5:30
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्याची माहिती प्रसिद्ध होताच लगेचच शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले.

लष्करी कारवाईचे उद्योगजगताकडून समर्थन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्याची माहिती प्रसिद्ध होताच लगेचच शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. पण उद्योगजगताने मात्र लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. आता कठोर कारवाईची वेळ आली आहे. अशा कारवाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, व्यापारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता उद्योगजगताने फेटाळून लावली.
यापूर्वी आपल्यावर हल्ले झाले त्यावेळी आपण लोकशाही पद्धतीने वागलो पण आता उत्तर देण्याची वेळ आली आहे असे बायकॉनच्या सीएमडी किरण मुझमदार शॉ यांनी टि्वट केले. यापूर्वी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुध्दा लष्करावर आपला पूर्ण विश्वास असून, कधी आणि कशा पद्धतीने उत्तर द्यायचे हे लष्कराला ठाऊक आहे असे टिवट आनंद महिंद्रा यांनी केले होते.
भारताच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे अध्यक्ष महेश गुप्ता यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रतिकुल परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता आहे असे आसोचेमचे सचिव जनरल डी.एस.रावत यांनी सांगितले. भारताच्या सर्जिकल स्ट्राईक्सच्या बातमीनंतर शेअर बाजारात उमटलेली प्रतिक्रिया समजून घेता येईल. पण त्याचा अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाह असे चेंबरने म्हटले आहे.
I don't need to add anything more today... https://t.co/8tFREHLf1Z
— anand mahindra (@anandmahindra) September 29, 2016