ममता बॅनर्जी यांचा आंदोलनाला पाठिंबा

By Admin | Updated: August 21, 2015 22:26 IST2015-08-21T22:26:39+5:302015-08-21T22:26:39+5:30

पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री

Support for Mamta Banerjee's agitation | ममता बॅनर्जी यांचा आंदोलनाला पाठिंबा

ममता बॅनर्जी यांचा आंदोलनाला पाठिंबा

कोलकाता : पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संस्थेतील विद्यार्थी गेल्या ७१ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.
केंद्र सरकारने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना विश्वासात घेऊनच हा वाद तात्काळ सोडविला पाहिजे. माझा विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Support for Mamta Banerjee's agitation