शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बळीराजाला ‘आधार’ : लघुउद्योजकतेला बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:47 AM

शेतीमालाच्या किमान किमतींत वाढ : लघू, मध्यम उद्योगांची व्याख्या व्यापक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी १४ खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्चाच्या किमान ५० टक्क्यांहून जास्त परतावा मिळेल अशा स्वरूपाची वाढ केली आहे. ही वाढ २०२०-२१ या वर्षासाठी आहे. भाताच्या किमतीत किरकोळ ५३ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ते ११६८ रुपये करण्यात आले आहे, तर तेलबिया, डाळी आणि भरड धान्ये यांच्या किमतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट ‘एमएसपी’ देण्याचा वादा लागोपाठ दुसऱ्या वर्षी पूर्ण केल्याचा दावा सरकारने केला.नगदी पिकांमध्ये कापसाच्या किमान आधारभूत किमतीत मध्यम धाग्याच्या जातीच्या कापसाच्या किमतीत प्रतिक्विंटल २६० रुपये वाढ करून ती ५,५१५ करण्यात आली आहे, तर लांब धाग्याच्या कापसाच्या दरात २७५ रुपये वाढ करूनरण्यात येईल, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये करण्यात आली आहे. याचबरोबर सरकारने तीन लाख रुपयांचे कृषी आणि संबंधित कामासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या परतफेडीला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने २०२०-२०२१ साठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या. उत्पादन खर्चापेक्षा त्या ५० ते ८३ टक्के जादा परतावा देणाºया आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. याद्वारे केंद्र सरकारने २०१८-२०१९ मध्ये कृषिमालाला दीडपट भाव देण्याच्या केलेल्या घोषणेला अनुसरून या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत.नाचणीच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल १४५ रुपये वाढ करून ती ३२९५ रुपये करण्यात आली आहे. मक्याची किंमत प्रतिक्विंटल ९० रुपयांनी वाढवून ती १८५० करण्यात आली आहे. ज्वारीच्या दरात ७० रुपयांनी वाढ केल्यामुळे हायब्रीड ज्वारीची किंमत प्रतिक्विंटल २६२०, तर मालदंडी ज्वारीच्या २६४० रुपये झाली आहे. बाजरीचा दर १५० रुपये वाढ करून २१५० रुपये प्रतिकिवंटल करण्यात आला आहे. बाजरीच्या दरातील वाढ ही उत्पादन खर्चाच्या ८३ टक्के जादा आहे.उडीद दरात प्रतिक्विंटल ३०० रुपये वाढ करून ती सहा हजार करण्यात आली आहे, तर तुरीच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ करून तोही प्रतिक्विंटल सहा हजार रुपये निश्चित करण्यात आला आहे. मूग दरात १४६ रुपये वाढ करून तो प्रतिक्विंटल ७१९६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.खाद्यतेलाच्या आयात कमी करण्यासाठी सरकारने तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीत यंदा भरीव वाढ केली आहे. सोयाबीन (पिवळा) १७० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ३८८० रुपये, सुर्यफूल २३५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५८८५ रुपये तर भूईमूग १८५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ५२७५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे, तर करडईच्या दरात ७५५ रुपये वाढ करून प्रतिक्विंटल ६६९५ रुपये रुपये करण्यात आला आहे. तीळाच्या दरात ३७० रुपये वाढ करून तो ६८५५ रुपये करण्यात आला आहे.सरकारच्या म्हणण्यांनुसार शेतकऱ्यांना या १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. सर्वाधिक बाजरी ८३ टक्के, उडिद ६४ टक्के, मका ५३ टक्के तर उर्वरित पिकांना ५० टक्के जादा दर मिळणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी