शारदाप्रकरणी सीबीआय दाखल करणार पूरक आरोपपत्र
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़ सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे संबंधित सूत्राने सांगितले़

शारदाप्रकरणी सीबीआय दाखल करणार पूरक आरोपपत्र
क लकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी सीबीआयची विशेष गुन्हे शाखा पुढील आठवड्यात पूरक आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे़ सीबीआयच्या सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली़ शारदा घोटाळाप्रकरणी या आठवड्यात आम्ही अलीपूर न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल करणार आहोत, असे संबंधित सूत्राने सांगितले़सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात पश्चिम बंगालचे मंत्री मदन मित्रा, तृणमूलचे माजी राज्यसभा खासदार श्रींजॉय बोस आणि निलंबित खासदार कुणाल घोष व अन्य व्यक्तींचा समावेश असणार आहे़ शारदा घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेल्या काही प्रभावशाली व्यक्तींची नावेही यात असणार आहेत़मित्रा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामिनासाठी त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावरील सुनावणी अद्याप व्हायची आहे़अलीकडे सीबीआयने शारदा घोटाळाप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुदीप्तो सेन, देबजनी मुखर्जी, रजत मुजुमदार, सदानंद गोगोई, देबब्रता मुजुमदार आणि कुणाल घोष आदींच्या नावांचा समावेश होता़दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांच्या मते, सीबीआयच्या पूरक आरोपपत्रानंतर अंमलबजावणी संचालनालयाद्वारेही याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले जाणार आहे़ (वृत्तसंस्था)