शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Supertech Twin Towers: भ्रष्टाचाराचे शिखर कोसळले; स्वप्नांचा उडाला धुरळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 07:15 IST

Supertech Twin Towers Demolition: नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला,

लोकमत न्यूज नेटवर्क : नोएडातील सेक्टर ९३ एमधील सुपरटेकचे ट्विन टॉवर भ्रष्टाचारामुळे अनेक वर्षे वादात सापडले होते. अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर ते पाडण्यात आले. मात्र यामुळे ज्या ग्राहकांनी येथे आपल्या स्वप्नातील घर घेण्याचे स्वप्न पाहिले त्यांच्या स्वप्नांचा यावेळी धुरळा उडाला, ज्यामुळे काही मिनिटे डोळ्यांसमोर फक्त धुळीचे साम्राज्य पसरले होते. ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी ३७०० किलोपेक्षा अधिक स्फोटकांचा वापर करण्यात आला. यामुळे बाजूच्या इमारतींच्या काचाही काहीकाळ थरथरल्या... 

५०० कोटींचे नुकसानसुपरटेकचे चेअरमन आर. के. अरोडा यांनी सांगितले की, ट्विन टॉवर इमारती पाडल्याने कंपनीचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात इमारतीच्या उभारणीपासून ते जमिनीची खरेदी, नोएडा प्राधिकरणाच्या मंजुरीचे शुल्क, बँकांच्या कर्जावरील व्याज आदींचा समावेश आहे. याशिवाय या टॉवरमध्ये फ्लॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२ टक्क्यांनी व्याज द्यावे लागले आहे. या टॉवरमधील ९०० पेक्षा अधिक फ्लॅटची किंमत ७०० कोटी रुपये होती. ही इमारत पाडणाऱ्या एडिफिस इंजिनिअरिंगला सुपरटेक १७.५ कोटी रुपये देत आहे. 

नियमानुसारच ट्विन टॉवर बांधले गेले : सुपरटेक नोएडा विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या बिल्डिंग प्लॅननुसार ट्विन टॉवर बांधले होते आणि त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत, असे बांधकाम फर्म सुपरटेकने म्हटले आहे.

५०० पोलीस तैनात नोएडातील ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी या भागात ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. टॉवरच्या चारही बाजूंनी ५०० मीटरच्या क्षेत्रात प्रवेशबंदी करण्यात आली होती. अखेरच्या क्षणी एक  व्यक्ती झोपलेली आढळली परिसरातील १५ इमारती रिकाम्या केल्या होत्या. मात्र, अपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती गाढ झोपेत असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर या व्यक्तीला झोपेतून उठविले आणि टॉवरमधून बाहेर काढले.

‘त्या’ लोकांनी येऊ नयेश्वासाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी ट्विन टॉवर पाडलेल्या भागात काही दिवस जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. या परिसरात ८० टन ढिगारे साचले आहेत. हवेतही धूळ मोठ्या प्रमाणात आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या धुळीमुळे दमा आणि हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. 

181 दिवसांत तयार झाला प्लॅन n ट्विन टॉवर पाडण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला त्याचे नाव आहे इम्प्लोजन.  n या तंत्रज्ञानाचा उपयोग निवासी भागातील गगनचुंबी इमारती पाडण्यासाठी केला जातो. n इम्प्लोजन तंत्रज्ञानाने ३२ मजली इमारती केवळ १२ सेकंदांत जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र, याची तयारी १८१ दिवसांपासून सुरू होती. n या इमारती पाडण्याची जबाबदारी मुंबईच्या एडिफाइस इंजिनिअरिंग आणि दक्षिण आफ्रिकेतील जेट डिमोलिशन्सकडे होती. n २१ फेब्रुवारी २०२२ पासून ३५० कामगार आणि १० इंजिनिअर ही इमारत पाडण्याच्या कामात व्यस्त होते, असे यावेळी सांगण्यात आले.

अशी केली तयारी इंजिनिअर्सनी ट्विन टॉवरची ब्ल्यू प्रिंट काढली. स्फोटाचे नियोजन आणि त्याचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला. इमारतीचे पिलर्स आणि भिंतीवर ३५ मिलिमीटरची ९,६४२ छिद्रे पाडली. भिंतीवर जियोटेक्सटाइल कपडे टाकले. ज्यामुळे ढिगारे पसरले नाहीत. नजीकची गॅस पाइपलाइन वाचविण्यासाठी स्टील प्लेटस् टाकण्यात आल्या. ५. पिलर्स आणि भिंतीत बनविलेल्या छिद्रांत जवळपास ३,७०० किलो स्फोटके लावण्यात आली.

प्राण्यांनाही कोंडलेटॉवर पाडण्यापूर्वी परिसरातील ५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. यावेळी श्वान आणि इतर प्राण्यांनाही सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते. टॉवर पाडल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

न्यायालयाचा दणका डिसेंबर २०१२ : इमेराल्ड हाउसिंग सोसायटीचे लोक अलाहाबाद हायकोर्टात गेले व असा दावा केला की, गार्डन एरियात २ अवैध इमारती उभारण्यात आल्या आहेत. एप्रिल २०१४ : हायकोर्टाने टॉवर्स पाडण्याचे निर्देश दिले, तसेच ज्यांनी फ्लॅट बुक केले त्यांना १४ टक्के व्याजाने रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. ३१ ऑगस्ट २०२१ : सुपरटेकला सर्वोच्च न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयाने दोन्ही टॉवर पाडण्याचे निर्देश दिले. फेब्रुवारी २०२२ : नोएडा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, टॉवर पाडण्याचे काम २२ मेपर्यंत पूर्ण केले जाईल. २८ ऑगस्ट २०२२ : अखेर ट्विन टॉवर पाडण्यासाठी २८ ऑगस्ट २०२२ ही तारीख निश्चित करण्यात आली. 

टॅग्स :IndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश