सुपरस्टार अमिताभ आणि जया राहतात वेगळे
By Admin | Updated: January 23, 2017 16:43 IST2017-01-23T16:43:21+5:302017-01-23T16:43:21+5:30
सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचा खुलासा बीग बी यांच्या निकटवर्तीयांने केला आहे

सुपरस्टार अमिताभ आणि जया राहतात वेगळे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचा खुलासा बीग बी यांच्या निकटवर्तीयांने केला आहे. अमिताभ बच्चन यांचे निकटवर्तीय असलेले आणि समाजवादी पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले अमर सिंह यांनी काल हा गौप्यस्फोट केला आहे. सतत नेहमी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यांविषयी अनेक बातम्या येत असतात.
सपामधून हकालपट्टी झाल्यानंतर काल वाराणसी येथील गढवा आश्रमात आलेल्या अमरसिंह यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली. मीच भांडणे लावतो, असा माझ्यावर आरोप होतो. पण ते खरे नाही. माझ्यावर अमिताभला जयापासून वेगळे केल्याचा आरोप झाला. पण वस्तूस्थिती अशी की, अमिताभ जनक आणि जया प्रतीक्षामध्ये आधीपासूनच वेगळे राहतात. अंबानी परिवारातही मी भांडणे लावली असे म्हटले जाते. त्यांच्यात भांडणे लावून धीरूभाईंची संपत्ती मला थोडीच मिळणार आहे? माध्यमांनी सर्व आरोप माझ्यावर लादले. कारण त्यांच्या दृष्टीने मी खलनायक आहे. जिथे जिथे भांडणं होतात तिथे तिथे मलाच कारणीभूत समजत माझ्यावरच ठपका लावला जात असल्याचेही यावेळी अमर सिहं यांनी म्हटले आहे.