‘सुपर मॉम’चा विजय!
By Admin | Updated: October 2, 2014 02:04 IST2014-10-02T02:04:01+5:302014-10-02T02:04:01+5:30
इंचियोन एशियाडमधील तिचे 51 किलोगटातील सुवर्णपदक जिंकणो, हा अप्रतिम विजय तर आहेच; शिवाय भारतीय महिलांसाठी गर्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने व्यक्त केली.
‘सुपर मॉम’चा विजय!
महिलांसाठी गर्वाचा क्षण : प्रियंका चोप्रा व बॉलीवूडने केले मेरी कोमचे कौतुक
नवी दिल्ली : माजी विश्वचॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तीन मुलांची आई आहे. तरीही, इंचियोन एशियाडमधील तिचे 51 किलोगटातील सुवर्णपदक जिंकणो, हा अप्रतिम विजय तर आहेच; शिवाय भारतीय महिलांसाठी गर्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने व्यक्त केली.
प्रियंकाने चित्रपटात मेरी कोमची भूमिका साकारली आहे. प्रियंका पुढे म्हणाली, ‘‘मेरी कोमवर देशाला गर्व वाटतो. महिला काहीही करू शकतात, हे या खेळाडूने दाखवून दिले. कठोर मेहनतीमुळे हा विजय साकार झाला. तीन मुलांच्या आईचा हा विजय वाखाणण्यासारखा आहे.’’ काल सेमीफायनल गाठताच प्रियंकाने मेरी कोमला दूरध्वनीवर शुभेच्छा दिल्या होत्या. टि¦टरवर ती म्हणाली, ‘अभिनंदन! तू सलग ऐतिहासिक कामगिरी करीत आहेस. तुझी कथा देशाला ऐकवून मी स्वत:ला धन्य मानते.’
बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिनेदेखील मेरी कोमची पाठ थोपटली. ज्वाला म्हणाली, ‘‘मेरी कोमच्या सुवर्णावर मी खूष आहे. या खेळाडूकडून प्रेरणा घेण्यासारखे आहे. आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना खेळाकडे पाठवायला हवे.’’