सुखोईला अपघात ही मानवी चूक- रशियाचा दावा वायुदलाचा मात्र इन्कार : अद्याप अंतिम निष्कर्ष नाही
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:12+5:302015-02-20T01:10:12+5:30
बंगळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.

सुखोईला अपघात ही मानवी चूक- रशियाचा दावा वायुदलाचा मात्र इन्कार : अद्याप अंतिम निष्कर्ष नाही
ब गळुरू : भारतात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान कोसळण्याची घटना मानवी चुकीमुळे घडल्याचा दावा रशियाच्या इरकुट कॉपार्ेरेशनचे उपाध्यक्ष व्हिटाली बोरोडिक यांनी केला असून भारतीय वायुदलाने त्याचा इन्कार केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुखोई कोसळल्यानंतर भारताने या विमानांच्या संपूर्ण ताफ्याचा वापर एक महिन्यासाठी थांबविला होता.मानवी चुकीमुळेच अपघात घडल्याची आमची भूमिका आहे. भारतीय वायुदलाने ही चूक मान्य केली आहे. त्यामुळेच हे विमान अजूनही सेवेत आहे, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात भारताने हा दावा मान्य केलेला नाही, हे उल्लेखनीय.इरकुट ही रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉपार्ेरेशन या सरकारी कंपनीची उपशाखा आहे.भारतीय वायुदलाने या अपघाताबद्दल कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. विमानातील इंजेक्शन सीटच्या समस्येमुळे हा अपघात झाल्याची माहिती वायुदलप्रमुख अरूप राहा यांनी दिली होती. ------------------------------मेक इन इंडियाला रशियाचे समर्थनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिल्याबद्दल रोस्टेक या रशियन सरकारी कंपनीने जोरदार समर्थन केले आहे. नागरी आणि संरक्षण क्षेत्रात विकास, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम ही कंपनी करते. भारताने अमेरिकेकडून उत्पादने खरेदी केल्यामुळे आमचे भारतासोबतचे संबंध बिघडणार नाहीत. आम्ही कोणत्याही देशाला अन्य देशांची उत्पादने खरेदी करण्याला अटकाव घालत नाही. अमेरिकेचे मात्र तसे नाही, असे या कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले.---------------------------सुखोई आता ब्रह्मोसने सुसज्ज ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त गती असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडलेले एकात्म सुखोई- ३० लढाऊ विमान एचएएल या भारतीय कंपनीने गुरुवारी वायुदलाच्या सुपूर्द केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जोडल्यामुळे हे विमान अतिशय घातक शस्त्रांनी सुसज्ज झाले असल्याचे एचएएलचे अध्यक्ष टी सुवर्णा राजू यांनी स्पष्ट केले. या कंपनीच्या अंतर्गत डिझाईन चमूने ब्रह्मोसच्या एकत्रीकरणाचे काम चोखपणे पार पाडले. येथे हवाईदलाच्या येलहंका तळावर एअरो शोच्या वेळी ते वायुदलाच्या सुपूर्द करण्यात आले.