संडे पान 4 फातोर्डातील खुनी हल्ला प्रकरणी साक्ष

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:02+5:302015-03-08T00:31:02+5:30

मडगाव : फातोर्डा येथील ज्येष्ठ नागरिकावरील खुनी हल्ला प्रकरणी दक्षिण गोवा साहाय्यक सत्र न्यायाधीक्ष बेला नायक यांनी ममता आडपईकर यांची साक्ष नोंदवून घेतली.

Sunday Pan 4 testimony against the case of the murderer assault in the Patton | संडे पान 4 फातोर्डातील खुनी हल्ला प्रकरणी साक्ष

संडे पान 4 फातोर्डातील खुनी हल्ला प्रकरणी साक्ष

गाव : फातोर्डा येथील ज्येष्ठ नागरिकावरील खुनी हल्ला प्रकरणी दक्षिण गोवा साहाय्यक सत्र न्यायाधीक्ष बेला नायक यांनी ममता आडपईकर यांची साक्ष नोंदवून घेतली.
सरकारी वकील सुभाष देसाई यांनी घेतलेल्या सरतपासणीत ममता यांनी सांगितले की, 9 जून 2012 रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास, आनंद मुळे याने माझ्या पतीच्या उजव्या बाजूला पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला. मुळे याच्या हातून चाकू काढून घेण्याचा प्रयत्न केला असता संशयित खूपच आक्रमक झाला होता. पतीवर त्वरित वैद्यकीय उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले.
वकील जे. सेर्राव यांनी उलटतपासणी घेतली. खुनी हल्ल्याची ही घटना 9 जून 2012 रोजी फातोर्डा येथील जे.जे. इस्पितळ येथील फिर्यादीच्या घरासमोर घडली. संशयित मुळे याने पूर्ववैमनस्यातून त्याचा शेजारी शंभू ऊर्फ खेमू नाईक आडपईकर यांच्या अंगणात येऊन तेथे उभा असलेल्या शंभू आडपईकर यांच्यावर हल्ला केला होता. उपनिरीक्षक अजित उमर्ये यांनी या प्रकरणाचा तपास करताना 307 कलमाखाली हे प्रकरण नोंदवून घेतले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sunday Pan 4 testimony against the case of the murderer assault in the Patton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.