सुनेवर बलात्कार

By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:43+5:302015-09-02T23:31:43+5:30

सुनेवर बलात्कार

Sunavar rape | सुनेवर बलात्कार

सुनेवर बलात्कार

नेवर बलात्कार
हुंड्यासाठी केला छळ : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : हुंड्यासाठी छळल्या जात असलेल्या एका नवविवाहितेवर तिच्याच सासऱ्याने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात घडली.
अमरावती येथील २८ वर्षीय तरुणीचे जानेवारी २०१३ मध्ये एमआयडीसीतील एका तरुणाशी लग्न झाले होते. विवाहितेचा पती शिक्षक आहे. लग्नाच्या काही दिवसानंतरच पती, सासरा आणि इतर कुटुंबीय हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले. माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागले. पीडितेचे आई-वडील गरीब असल्याने तिने या गोष्टीला फार गांभीर्याने घेतले नाही.
आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून ते तिला आणखी त्रास देऊ लागले. तिला चाकू फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून पीडिता त्रास सहन करीत होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ३१ मार्च रोजी तिला सर्दीचा त्रास झाला. ती पलंगावर लेटली असताना तिच्या सासऱ्याने तिच्या तोडावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सासऱ्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान तिला अमानवीय त्रास दिला. शुद्धीवर येताच पीडित महिला अमरावतीला आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली.
पीडितेने एमआयडीसी पोलिसांना पत्र लिहून आपबिती सांगितली. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. नागपुरात पोहोचून विवाहितेने तक्रार दाखल केली. एमआयडीसी पोलिसांनी बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी शिक्षित आणि संपन्न कुटुंबातील आहे.

बॉक्स
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी मो. जुनैद मुस्ताक दिलावर (२५) रा. खदान याला मानकापूर पोलिसांनी अटक केली. जुनैद तीन वर्षांपासून १८ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिला फिरवीत होता. यादरम्यान त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विरोध केला असता वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होता.

Web Title: Sunavar rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.