सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच
By Admin | Updated: January 23, 2016 03:31 IST2016-01-23T03:31:18+5:302016-01-23T03:31:18+5:30
सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याचा निष्कर्ष दिल्लीतील आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वैद्यकीय मंडळाने एफबीआयच्या अहवालावर मत देताना काढला आहे

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याचा निष्कर्ष दिल्लीतील आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) वैद्यकीय मंडळाने एफबीआयच्या अहवालावर मत देताना काढला आहे. अमेरिकेच्या संघीय तपाससंस्थेने (एफबीआय) व्हिसेरा नमुन्यांबाबत अहवाल सादर केला होता. सुनंदा यांच्या पोटात मानसिक अधीरतेवर (एन्झायटी) दिले जाणारे अलप्राक्स हे औषध आढळून आले.
वैद्यकीय मंडळाने सुनंदा यांच्या शरीरावरील विशिष्ट खूण पाहता इंजेक्शनमधून विष दिले किंवा घेतले गेल्याची शक्यता नाकारलेली नाही. लिडोकेईनचे अस्तित्व आढळून आल्याचा उल्लेख एफबीआयच्या अहवालात आहे. त्याबाबतची माहिती वैद्यकीय मंडळाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. औषधीद्रव्याच्या संयुगातून मृत्यू झाल्याची शक्यता मात्र फेटाळण्यात आली. एफबीआयच्या अहवालाविना या संपूर्ण प्रकरणाचा तपास कुचकामी मानला जाईल अशी भीती मंडळाला होती. सुनंदा यांच्या शरीरावर सिरिंज टोचल्याची खूण आढळल्यामुळे कुणी बाहेरील व्यक्तीने ते त्यांना टोचले का, याचा सखोल तपास करावा, असेही या मंडळाने सुचविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क