शारदा घोटाळाप्रकरणी तृणमूल खासदाराला समन्स
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:21+5:302015-02-06T22:35:21+5:30
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) आज शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष तसेच माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मतंग सिंह यांच्यासह दोन सहकाऱ्यांना समन्स बजावला आहे़

शारदा घोटाळाप्रकरणी तृणमूल खासदाराला समन्स
क लकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) आज शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार अर्पिता घोष तसेच माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते मतंग सिंह यांच्यासह दोन सहकाऱ्यांना समन्स बजावला आहे़अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता घोष यांना येत्या १३ फेबु्रवारीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत़ मतंग सिंह यांचे सहकारी ख्याती सदना आणि रूपेन्द्रनाथ सिंग यांनाही पुढील आठवड्यात हजर राहण्यास बजावले आहे़