सोनिया गांधी, राहुल यांना समन्स
By Admin | Updated: June 27, 2014 01:52 IST2014-06-27T01:52:49+5:302014-06-27T01:52:49+5:30
दिल्लीतील एका न्यायालयाने ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्रची मालकी मिळवण्यासाठी कथित निधीचा दुरुपयोग अणि फसवणुकीच्या आरोपात समन्स बजावला आहे.

सोनिया गांधी, राहुल यांना समन्स
>नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध आज दिल्लीतील एका न्यायालयाने ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्रची मालकी मिळवण्यासाठी कथित निधीचा दुरुपयोग अणि फसवणुकीच्या आरोपात समन्स बजावला आहे. हे वृत्तपत्र आता बंद पडले आहे.
हे समन्स बजावताना महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे जात असल्याचे नमूद केले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबतचकाँग्रेस नेते मोतिलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना समन्स बजावण्यात आला.
स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर निधीचा दुरुपयोग करणो आणि षड्यंत्र रचण्याचा आरोप केला होता. त्यांनी तक्रार केली होती की, केवळ 5क् लाख रुपयांचे पेमेन्ट करून यंग इंडियन कंपनीला 9क्.25 कोटी रुपयांच्या वसुलीचे अधिकारी मिळवून दिले. ही रक्कम असोसिएटेड जर्नल्सने काँग्रेस पक्षाला द्यायची होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्रच्या मालकीशी संबंधित असलेले हे प्रकरण भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात नेले आहे. स्वामी यांनी आरोपींविरुद्ध फसवणूक आणि निधीचा दुरुपयोग तसेच विश्वासघाताची तक्रार केली होती.
4काँग्रेसने एक नवी कंपनी स्थापन केली आणि ‘नॅशनल हेरॉल्ड’ची खरेदी केली. त्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या निधीचा दुरुपयोग केला, असा स्वामी यांचा आरोप आहे.
4यंग इंडिया कंपनी 2क्1क् ला स्थापन करण्यात आली. या कंपनीत सर्व आरोपी संचालक आहेत. या कंपनीने नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लि.चे कर्ज घेऊन टाकले होते.