मुजफ्फरनगर दंगल आयोगाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स
By Admin | Updated: January 23, 2015 01:03 IST2015-01-23T01:03:42+5:302015-01-23T01:03:42+5:30
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीची चौकशी करीत असलेल्या एक सदस्यीय तपास आयोगाने हिंसाचारादरम्यान कामावर तैनात असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.

मुजफ्फरनगर दंगल आयोगाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स
म जफ्फरनगर : मुजफ्फरनगर दंगलीची चौकशी करीत असलेल्या एक सदस्यीय तपास आयोगाने हिंसाचारादरम्यान कामावर तैनात असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे.सेवानिवृत्त न्यायमूर्ती विष्णु सहाय यांनी सांगितले की, याप्रकरणी येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अरुणकुमार आणि सहारनपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त भूवनेश्वरकुमार यांच्यासह आणखी नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आयोगातर्फे बुधवारी मुजफ्फरनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंझिल सैनी, शामलीचे जिल्हाधिकारी पी.के. सिंग आणि मुजफ्फरनगरचे मुख्य विकास अधिकारी रवींद्र गोडबोले यांच्यासह सहा जणांचे बयाण नोंदविले. उत्तर प्रदेश सरकारने मुजफ्फरनगर हिंसाचाराच्या चौकशीसाठी सप्टेंबर २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विष्णु सहाय यांचा एक सदस्यीय आयोग स्थापन केला होता. मुजफ्फरनगर आणि आजूबाजूच्या परिसरात दंगली उसळल्यानंतर झालेल्या हिंसाचारात ६० च्यावर लोक मृत्युमुखी पडले होते. तर सुमारे ४०,००० लोकांना स्थलांतरण करावे लागले. (वृत्तसंस्था)