सारांश बातम्या

By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:53+5:302015-02-18T23:53:53+5:30

सारांश बातम्या

Summary News | सारांश बातम्या

सारांश बातम्या

रांश बातम्या
गांधीसागर तलावात मृतदेह आढळला
नागपूर : गांधीसागर तलावात रमण विज्ञान केंद्रासमोर बुधवारी सकाळी ११ वाजता एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. जगदीश रमेश खरे (३९) यांनी याबाबत गणेशपेठ पोलिसांना सूचना दिली.

रेल्वेस्थानकावर अनोळखी इसमाचा मृतदेह
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर मंुबई एण्डकडे एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाने लोहमार्ग पोलिसांना मृतदेह पडून असल्याची सूचना दिली. रेल्वेच्या डॉक्टरांनी संबंधित इसमास तपासून मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पाकीटमारास रंगेहात पकडले
नागपूर : प्रवाशांचे खिसे चाचपडणाऱ्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुमित नरेश तिरापुरे (२३) रा. चित्रा टॉकीजमागे, पुलगाव जि. वर्धा असे आरोपीचे नाव आहे. दुपारी १.३० वाजता तो प्लॅटफार्म क्रमांक १ वर प्रवाशांचे खिसे चाचपडत होता.

गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : आपल्या राहत्या घरी मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संदीप सत्यवान बोरकर (३२) रा. अंगुलीमालनगर यांनी आपल्या घरी सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली.

रॉकेलने पेटवून आत्महत्या
नागपूर : आपल्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जयभोलेनगर येथील रहिवासी पांडुरंग विश्वनाथ इंगोले (५०) यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता आपल्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात ते गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Summary News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.