सारांश बातम्या.....

By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:59+5:302015-08-26T00:18:59+5:30

Summary News | सारांश बातम्या.....

सारांश बातम्या.....

>कचरा जाळणे, आज सुनावणी
नागपूर : उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकरणावर हायकोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वातावरण प्रदूषित होते. नागरिकांना विविध आजार जडतात. यासंदर्भातील वृत्ताची दखल घेऊन हायकोर्टाने स्वत:च फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेत शासनासह विदर्भातील सर्व महानगरपालिका व नगर परिषदांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
आरोपीला जामीन
नागपूर : हायकोर्टाने हत्याप्रकरणातील आरोपी सुगत बागडेला सशर्त जामीन मंजूर केला आहे. सुभाष ठोसरच्या हत्याप्रकरणात सुगतसह चंदू महल्ले, अमर महल्ले व विजय चन्ने आरोपी आहेत. ही घटना १३ मे २०१४ रोजी महाल येथे घडली होती. चंदू व सुभाषमध्ये वाद होता. आरोपीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.
कैद्याला फर्लो
नागपूर : हायकोर्टाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदी राजू ढाकरेला १४ दिवसांची संचित रजा (फर्लो) मंजूर केली आहे. कारागृह प्रशासनाने रजेचा अर्ज फेटाळल्यामुळे त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने विविध बाबी लक्षात घेता त्याला दिलासा दिला. कैद्यातर्फे ॲड. अर्चना रामटेके यांनी बाजू मांडली.

Web Title: Summary News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.