सारांश बातम्या.....
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:40+5:302015-07-10T23:13:40+5:30
पब्लिक ट्रस्ट कायद्याला आव्हान

सारांश बातम्या.....
प ्लिक ट्रस्ट कायद्याला आव्हाननागपूर : विदर्भ चॅरिटी बार असोसिएशनने महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्यातील ६ व ६(ए) कलमाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. यावर हायकोर्टाने राज्याच्या महाधिवक्त्यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणावर ४ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. संबंधित कलमांतर्गत येणारी पदे हायकोर्टाच्या अधिपत्याखाली असावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.बँक विलिनीकरण, उत्तराची प्रतीक्षानागपूर : घोटाळ्यामुळे बुडालेल्या नागपूर महिला, समता व परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक यांचे दुसऱ्या सक्षम बँकेत विलिनीकरण करणे शक्य नसल्यास या बँका अवसायानात काढून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची शिफारस राज्य शासनाद्वारे गठित समितीने केली आहे. या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी काय केले यावर शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. याप्रकरणावर हायकोर्टात २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.धोक्याचे पेट्रोल पंप, सुनावणी तहकूबनागपूर : कामठी येथील प्रदीप सपाटे व राम अग्रवाल यांनी अवैध पेट्रोल पंपांविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पेट्रोल पंपाच्या जोडरस्त्याची लांबी, रुंदी, वळण व इतर बाबी तांत्रिकदृष्ट्या अचूक असाव्या लागतात, जेणेकरून पेट्रोल पंपाकडे जाताना व तेथून बाहेर पडताना वाहन थेट मुख्य रस्त्यावर येणार नाही. परंतु, हे नियम कुणीच पाळत नाही. हायकोर्टाने याचिकेवरील सुनावणी २९ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.