सारांश बातम्या.....

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:23+5:302015-07-06T23:34:23+5:30

दोषपूर्ण सर्वेक्षण, आज सुनावणी

Summary News | सारांश बातम्या.....

सारांश बातम्या.....

षपूर्ण सर्वेक्षण, आज सुनावणी
नागपूर : शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण दोषपूर्ण आहे असा दावा करून समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. हायकोर्टाच्या निर्देशानुसार शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी केवळ शिक्षकांवर सोपविणे चुकीचे असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
रेती उत्खनन, उत्तराकडे लक्ष
नागपूर : नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केली जात असून अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने हा गैरप्रकार सुरू असल्याचा दावा हायकोर्टात दाखल एका फौजदारी रिट याचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणी शासन काय उत्तर सादर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
भाऊ लोखंडेंची हायकोर्टात याचिका
नागपूर : प्रामाणिकपणे सेवा दिल्यानंतरही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने किरकोळ मानधनावर बोळवण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रा. भाऊ लोखंडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. लोखंडे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा केंद्रात कार्यरत होते.

Web Title: Summary News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.