सारांश: पती व सासूची विवाहितेस मारहाण

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:42+5:302015-02-14T23:51:42+5:30

अकोला: माहेरी जाण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून विवाहितेला तिच्या पती व सासूने भिंतीवर डोके आदळून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे घडली.

Summary: Hitting the husband and the wedding married | सारांश: पती व सासूची विवाहितेस मारहाण

सारांश: पती व सासूची विवाहितेस मारहाण

ोला: माहेरी जाण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरून विवाहितेला तिच्या पती व सासूने भिंतीवर डोके आदळून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे घडली.
संगीता मधुकर मुंडे (३0) हिच्या तक्रारीनुसार ती आजारी असल्याने माहेरी जाणार होती. त्यासाठी तिने पती मधुकर मुंडे व सासू चंद्रभागा प्रल्हाद मुंडे यांना पैसे मागितले. या कारणावरून दोघांनी तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्या डोक्याचे केश पकडून तिचे डोके भिंतीवर आदळले. यात संगीता जखमी झाली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
000000000000000
बैल लंपास
अकोला: पातूर तालुक्यातील बाभूळगाव येथील शिवहरी प्रल्हाद कोल्हे (३९) यांच्या गोठ्यातून शुक्रवारी दुपारी अज्ञात चोरट्याने त्यांचा बैल चोरून नेला. बैलाची किंमत २५ हजार रुपये आहे. कोल्हे यांच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
0000000000000000
शेतातील मोटारपंप लंपास
अकोला: घुसर येथील शेतातील गोडावूनच्या दरवाजाचे कुलूप तोडून व आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीदरम्यान १५ हजार रुपये किमतीचे दोन मोटारपंप लंपास केले. चंदू हरिभाऊ खडसे (३२) यांच्या तक्रारीनुसार, आकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
000000000000000000

Web Title: Summary: Hitting the husband and the wedding married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.