ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश पा
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
भूषण कदम, श्वेता कदमची नवोदयसाठी निवड

ग्रामीण हॅलो पान २ साठी सारांश पा
भ षण कदम, श्वेता कदमची नवोदयसाठी निवडमाढा : तालुक्यातील वडाचीवाडी जि़ प़ शाळेतील भूषण बिपीन कदम व श्वेता संजय कदम या दोन विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे़ त्यांना मुख्याध्यापिका सुनीता ठाकरे, संतोष राऊत यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भोईटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र कदम यांनी अभिनंदन केले़विशाल नाईकवाडे यांची मंत्रालय सहायकपदी निवडमाढा : तालुक्यातील उंदरगाव येथील विशाल अरुण नाईकवाडे यांची मंत्रालय सहायकपदी निवड झाली आहे़ जानेवारीमध्ये झालेल्या सहा़ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला़ त्यांच्या यशाबद्दल भैरवनाथ शुगरचे चेअरमन तानाजी सावंत, व्हा़ चेअरमन शिवाजी सावंत यांनी अभिनंदन केले़ मानेगाव जि़ प़ शाळेचे यशवैराग : मानेगाव (ता़ बार्शी) जि़ प़ शाळेतील विद्यार्थ्यांनी एटीएसई परीक्षेत यश मिळविले़ त्यामध्ये सायली जाधव, सुप्रिया मुळे, लक्ष्मी तेलगर यांचा समावेश आहे़ या विद्यार्थ्यांना सुवर्णा साठे यांचे मार्गदर्शन लाभले़ त्यांच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख सातपुते, विस्तार अधिकारी लाटे यांनी अभिनंदन केले़