सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2015 21:23 IST2015-07-19T21:23:13+5:302015-07-19T21:23:13+5:30

वाहनाची चोरी

Summary | सारांश

सारांश

हनाची चोरी
कल्याण : वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. निलेश परशुराम कुमावत याची मोटारसायकल तो राहत असलेल्या पूर्वेकडील शांती टॉवर परिसरातून चोरीला गेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
----------------------------------------------
घरफोडी
कल्याण : येथील पूर्वेकडील अयोध्यानगरी परिसरातील हनुमान अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या मंजुश्री परब यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी पावणेएक ते अडीचच्या दरम्यान भरदिवसा घडली.
----------------------
रोकड लंपास
कल्याण : येथील पश्चिमेकडील बाजारपेठेत खरेदी करीत असलेल्या इंदुताई आटपाळकर यांच्या पर्समधील २५ हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------
स्कॉर्पिओला अपघात
कल्याण : भरधाव वेगातील स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात गाडीतील रॉय डेव्हीस कुटीकरण आणि प्रकाश पातकर हे दोघे जण जखमी झाल्याची घटना डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी स्कॉर्पिओचालक रॉयवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------------
फेसबुकवर महिलेची बदनामी
कल्याण : एका विवाहित महिलेच्या फेसबुक अकाउंटचा बेकायदेशीररीत्या वापर करून त्यावर अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याच्या आरोपाखाली एका अनोळखी व्यक्तीविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पीडित महिला ही पूर्वेकडील
परिसरात राहते.
....................
मोबाइल चोरी
भिवंडी : रमजान ईदनिमित्ताने सलाउद्दीन अन्सारी हे वाहनचालक आपल्या मित्रासमवेत रात्री ११ वाजता खरेदी करण्यासाठी कोटरगेट बाजारात गेलेे होते. तेथे गर्दीचा फायदा घेऊन अफसर मुश्ताक शेख व त्याचा साथीदार कल्लू ऊर्फ कालिया यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल चोरला. ते पळून जात असताना अफसर यास जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्लू फरार झाला आहे.
वृद्धेचा मृत्यू
भिवंडी : भरधाव रिक्षाने ठोकर दिल्याने ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार बाजार स्लॅब, खोटाला मशिदीसमोर घडली असून रिक्षाचालक फरार झाला आहे. अमिनाबानू शेख (७५) मृत महिलेचे नाव असून ती तीनबत्ती येथून समदनगरकडे पायी जात होती.
................
वीज कर्मचार्‍यांना मारहाण
भिवंडी : शहरालगत कारिवली रोड येथील मौलाना सायझिंगजवळच्या ट्रान्सफॉर्मरमधून वीज घेतलेल्या मीटरचे मॅपिंग करीत असताना वीज कंपनीचे निखिल रामशेखर गोरे व त्यांच्या साथीदारांना सोहराब शेख व त्यांचा जावई अमीर याने शिवीगाळ करून मारहाण केली. सोहराब शेख याने कंपनीची कागदपत्रे फाडून फेकून दिली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गोरे यांनी तक्रार केली आहे.
..........
मोटारसायकल चोरणार्‍यास अटक
मुंब्रा : येथील झुलेखा कॉलनीत राहणार्‍या मोहम्मद इब्राहिम रफीक यांची मोटारसायकल चोरणार्‍या विसम तुर्की (रा. साईधाम बिल्डिंग, ठाकूरपाडा, मुंब्रा) याला पोलिसांनी अटक केली आहे
............

Web Title: Summary