सारांश

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:22+5:302015-08-27T23:45:22+5:30

ऑनलाइन फसवणूक

Summary | सारांश

सारांश

लाइन फसवणूक
भिवंडी : बँकेचे कार्ड बंद करणार असल्याची मोबाइलवरून धमकी देऊन अमित मिश्रा याने डेबिट कार्डचा व पिन नंबर घेऊन स्टेट बँकेच्या ग्राहक निलोफर आरिफ शेख यांच्या खात्यातून ९७ हजारांची ऑनलाइन शॉपिंग करून फ सवणूक केली.
-------------------
शेळ्यामेंढ्यांची चोरी
भिवंडी : शहरातील न्यू गौरापाडा भागात यंत्रमाग कारखान्यासमोर बांधलेल्या तीन शेळ्या, एक मेंढा व चार बोकड तीन दिवसांपूर्वी चोरीस गेले. ते एकूण २४ हजार रुपये किमतीचे असून याबाबत सोहेल अहमद हमीद काझी यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
............
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
टिटवाळा : श्री छत्रपती प्रतिष्ठान व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत गायत्री प्राथमिक विद्यालय, जिम्मीबाग, कोळसेवाडी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा लाभ जवळजवळ ३४८ नागरिकांनी घेतला. या शिबिरात हृदयरोग, ई.सी.जी., मधुमेह, रक्तदाब, ॲन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, मूत्रपिंड विकार, फुफफुसाचे आजार यासंदर्भात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासण्या करण्यात आल्या. सदर शिबिर इंदूबाई बाळासाहेब खबाले यांनी आयोजित केले होते0............................
भाजीविक्रेत्यावर चाकूचे वार
कल्याण : संतोष बनेवाल या भाजीविक्रेत्यावर मिलिंद खेडकर या अन्य भाजीविक्रेत्याने चाकूने वार केल्याची घटना तहसील कार्यालयामागे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला संतोषने आवाज दिल्याने रागाच्या भरात मिलिंदने त्याच्यावर चाकूने वार केले. यात संतोषच्या हाताला, पाठीला आणि पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी आरोपी मिलिंद यास पोलिसांनी अटक केली आहे.
------------------------------------------
सोनसाखळी चोरी
कल्याण : अलका देवता या महिलेच्या गळ्यातील ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी लंपास केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहासमोर बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
----------------------------------------
वृद्धेचा मृत्यू
कल्याण : तवमणी मणिक्कम या ६५ वर्षीय वृद्धेचा जिना उतरताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील गोग्रासवाडीत परिसरात घडली. याची नोंद टिळकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. १८ जून रोजी पाय घसरून पडल्याची घटना घडली. यात डोक्याला मार लागून जखमी झालेल्या तवमणी यांना उपचारार्थ प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर बनल्याने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे २ ऑगस्टला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
-----------------------------------
एक लाख १२ हजारांची रोकड लंपास
कल्याण : निलेश बांदेकर या हॉटेल व्यावसायिकाच्या मोटारसायकलच्या डिककीत ठेवलेली १ लाख १२ हजार ५०० रुपयांची रोकड
चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास येथील पश्चिमेकडील शंकरराव चौकात घडली. याप्रकरणी बाजारपेठ
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------
अनधिकृत बांधकाम
कल्याण : अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपाखाली हेमंत आणि अर्चना भांडारकर या दाम्पत्याविरोधात येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल झाला आहे. क प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. येथील टिळक चौकात असलेल्या माधव पॅलेस इमारतीत तळ मजल्यावर त्यांनी केडीएमसीची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.