सारांश

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:51+5:302015-08-08T00:23:51+5:30

स्केटिंग रॅलीचे यशस्वी आयोजन

Summary | सारांश

सारांश

केटिंग रॅलीचे यशस्वी आयोजन
नागपूर : विश्व ओ.आर.एस. सप्ताहांतर्गत तेजस्विनी विद्यामंदिरच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. पाटील, सचिव डॉ. चरडे, बालरोग तज्ञ डॉ. खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी तज्ञांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत जागृत राहण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बालरोग तज्ञ डॉ. वागीशजी कटारिया यांनी केले.
कुंभलकर महाविद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित
नागपूर : कुंभलकर समाजकार्य सांध्यकालीन महाविद्यालयात राष्ट्रीय युवा संघटनेच्यावतीने युवा प्रबोधन अभियानांतर्गत प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉर्ज ऑगस्टीन यांनी तरुणांमध्ये जातीवाद, धर्मवादापेक्षा भारतीय असण्याची भावना रुजावी असे आवाहन केले. डॉ. विनायक साखरकर, डॉ. भीमराव मेश्राम, डॉ. लक्ष्मीकांत चोपकर, संगिता पाठराबे यांनी कार्यक्रमासाठी प्ररिश्रम घेतले.
निळाईतर्फे केतन पिंपळापुरे यांना श्रध्दांजली
नागपूर : त्रैमासिक निळाईच्या वतीने दिवंगत पत्रकार व कवी केतन पिंपळापुरे आदरांजली वाहण्यात आली. हिंदी मोर भवनच्या अर्पण सभागृहात आयोजित श्रध्दांजली सभेत गोपीचंद कांबळे, समता सैनिक दलाचे अशोक खन्नाडे, इंजि. राहुल दहिकर, इंजि. जयंत इंगळे यांनी श्रध्दांजली सभेत बोलतांना केतन पिंपळापुरेच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.