सारांश
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:49+5:302015-07-31T23:54:49+5:30
सिमंेट रोड खोदून ड्रेनेजचे काम

सारांश
स मंेट रोड खोदून ड्रेनेजचे कामनागपूर : प्रभाग क्र. १६ मधील शांतिनगर येथील इंदिरा गांधी चौक ते विनायकराव देशमुख हायस्कूल तसेच तुलसी कॉलनीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकरण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु हे काम सिमेंट रोडचे खोदकाम करून केले जात आहे. यासाठी ३५ मीटर लांबीचा सिमेंट रस्ता खोदला जाणार असल्याने याची चौकशी करण्याची मागणी मोहन ढाले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...दौरा लांबल्याने अधिकाऱ्यांना दिलासा नागपूर : पंचायत राज समिती ऑगस्ट महिन्यात तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येणार होती. यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. परंतु दौरा पुढे ढकलण्यात आला असून सुधारित कार्यक्रमानुसार समिती सप्टेंबर महिन्यात दौऱ्यांवर येणार असल्याने अधिकाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ...समिती सदस्यांत नाराजीनागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत समिती सदस्यांना मागणीनुसार लाभार्थीचा कोटा मिळत नसल्याबाबत सदस्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. परंतु यामुळे इतर सदस्यांवर अन्याय होणार असल्याने सभापती पुष्पा वाघाडे यांच्यापुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे. ...अतिक्रमण हटविलेनागपूर : मंगळवारी व धंतोली झोनमधील ४० अतिक्रमण शुक्रवारी हटविण्यात आले. यात २९ लोक ांना दंड करण्यात आला. मंगळवारी झोनमधील काटोल मार्गावरील २९ अतिक्रमण हटविून १४ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बैद्यनाथ चौकातील मजदूर संघाच्या इमारती समोरील अतिक्रमण हटविण्यात आले. यात हातठेले व चहा टपऱ्याचा समावेश आहे.