सारांश

By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:18+5:302015-07-29T00:42:18+5:30

पुणे : एम. जी. सोशल फांऊडेशनच्यावतीने कमला नेहरू रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटक करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सतिश लालबिगे यांनी वाटप केले. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची पीयुसी चाचणी शिबीर घेण्यात आले. यावेळी परविन लालबिगे, अक्षय लालबिगे, सिद्धान्त लालबिगे यांनी आयोजन केले होते.

Summary | सारांश

सारांश

णे : एम. जी. सोशल फांऊडेशनच्यावतीने कमला नेहरू रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटक करण्यात आली. संस्थेचे संस्थापक सतिश लालबिगे यांनी वाटप केले. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची पीयुसी चाचणी शिबीर घेण्यात आले. यावेळी परविन लालबिगे, अक्षय लालबिगे, सिद्धान्त लालबिगे यांनी आयोजन केले होते.
...............
शिशूमंदीरात पालखी सोहळा
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील म.ग़ए. संस्थेच्या शिशूमंदीरात स्वच्छता अभियान या विषयावर पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाा होता. यावेळी वारकर्‍यांच्या वेशात नटून मुलींनी शाळेच्या आवारात पालखीची मिरवणूक काढली. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, रस्ते बागा लखलखीत्, गडटेकड्या पुण्याची शान, स्वच्छता नांदे घरोघरी अशा घोषणा मुलींनी दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यपिका मंजिरी मराठे, उपमुख्याध्यापिका अनघा रानडे यांनी केले.
...............
मेळावा
पुणे : रिपब्लिकन सिनेनिर्मिती कर्मचारी सेनेचा ज्युनियर आर्टीस्ट मेळावा नुकताच झाला. यावेळी ज्युनियर आर्टीस्ट व संबंधित कर्मचार्‍यांना निर्मात्यांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना मिळणारा मेहनताना हा युनियनमार्फत द्यावा, शासनाच्या प्रॉव्हिडंड फंडामध्ये सामील करून घ्यावे, कामाच्या तासाचा नियम काटेकोरपणे राबवावा, ओव्हर टाईम देण्यात यावा असे ठराव करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी या सेनेचे केंद्रीय अध्यक्ष सुर्यकांत सर्वगौड हे होते. यावेळी दिग्दर्शक शाकीर शेख, राहुल बळवंत निर्माता प्रकाश पाटील, रौफ शेख यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.