सारांश

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:49+5:302015-07-12T23:56:49+5:30

काशीनगर आठवडी बाजार नियमित सुरू होणार

Summary | सारांश

सारांश

शीनगर आठवडी बाजार नियमित सुरू होणार
नागपूर : काशीनगर येथे सोमवारी भरणारा आठवडी बाजार नियमित सुरू करावा, यासाठी अलका कांबळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने महापौर प्रवीण दटके यांची भेट घेतली. यावेळी महापौर यांनी काशीनगर बाजार नियमित सुरू ठेवण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी शोभा भगत, सुरेंद्र मस्के, विलास सोनटक्के, महेश मानकर आदी उपस्थित होते.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात लोकसंख्या दिनाचे आयोजन
नागपूर : ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांनी मते मांडली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सरला शनवारे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. रचना धडाडे, स्वप्निल निमगडे, प्रा. सुलोक रघुवंशी, डॉ. व्यंकटी नागरगोजे आदी उपस्थित होते.
गॅस सबसिडी संदर्भात विभागीय उपायुक्तांशी चर्चा
नागपूर : नागपूर विभागीय पुरवठा उपायुक्त यांच्याशी अ.भा. ग्राहक कल्याण परिषदेच्या शिष्टमंडळाने ग्राहकांना गॅस सबसिडी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना सांगितले की, पहिले कंपनीने अधिकाऱ्यांचा पगार कमी करावा, मंत्री, आमदार, खासदारांनी कमिशन घेणे बंद करावे, क्लास वन अधिकाऱ्यांची हवाई सेवा बंद करावी तेव्हाच गॅस ग्राहक सबसिडी सोडण्यावर विचार क रेल. यावेळी देवेंद्र तिवारी, किशोर गायधने, डी. ए. गोळे, अनिल लांजेवार आदी उपस्थित होते.
प्रभाग ६५(ब) मध्ये आजार वाढले
नागपूर : प्रभाग ६५ (ब) मधील बालाजीनगर, नाईकनगर, चंद्रनगर या परिसरात डासांचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे घराघरात आजार वाढले आहे. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे औषधांची फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. कचरा उचलणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहे. नागरिकांनी नगरसेवकांना यासंदर्भात तक्रारीही केल्या आहेत. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.