सारांश
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30
झोपडपीवासीयांना मालकी हक्काचे पे

सारांश
झ पडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टेनागपूर : ग्रामीण भागातील झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घराचे मालकीचे पट्टे शासनाने प्रदान करावे, अशी मागणी झोपडपट्टी संघर्ष समितीने केली आहे. पंचशीलनगर येथे झालेल्या नागरिकांच्या सभेत ही मागणी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी युवराज फुलझेले होते. याप्रसंगी अनिल वासनिक, राजकुमार वंजारी, रूपचंद गद्रे, चंद्रशेखर शुक्ला, शैलेंद्र वासनिक आदींनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात झोपडपट्टीवासीयांनीही आपल्या समस्या सांगून मालकी हक्काचे पट्टे मिळणे किती आवश्यक आहे, याचा उहापोह केला. -------रमाई संदेश यात्रेचा समारोप नागपूर : स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्यावतीने काढण्यात येणाऱ्या रमाई संदेश यात्रेचा समारोप करण्यात आला. ही यात्रा ३,४१० कि.मी.चा प्रवास करून आली आहे. यात्रेचा समारोप दीक्षाभूमी येथे करण्यात आला. या यात्रेचे नेतृत्व राजकुमार वंजारी, मधुकर गजभिये, कमलेश वासनिक, ज्ञानदेव गजभिये यांनी केले. या यात्रेच्या निमित्ताने राज्यभर रमाईच्या त्यागमय जीवनाची माहिती आणि त्यांचा संदेश प्रसारित करण्यात आला. यात्रेच्या प्रवासात ठिकठिकाणी रमाईच्या जीवनावर चित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. -------वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन नागपूर : हिंदू महासभेतर्फे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतिदिन टिळक पुतळा, महाल येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी फडके यांच्या प्रतिमेला मालार्पण केले. याप्रसंगी त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्यकतृर्त्वावर प्रकाश टाकून त्यांच्या देशकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला हिंदू महासभेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमानंतर वंदे मातरम्चा जयघोष केला. ----------खाटीक समाजाच्या शिष्टमंडळाची पालकमंत्र्यांशी भेट नागपूर : महाराष्ट्र खाटीक समाजाच्यावतीने पाचपावली अस्थायी मटन विक्रेत्याचे एक शिष्टमंडळ बाळकृष्ण लारोकर यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले. याप्रसंगी त्यांना खाटीक समाजाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देऊन या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी समाजाच्या मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात विजय ढोके, केशवराव माकोडे, विनोद ढोके, राजेराम दुर्गे, शिवलाल वानखेडे, रमेश तुमाने, मोतीलाल दुर्गे, संजय लारोकार आदींचा समावेश होता.