सारांश

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:34+5:302015-02-06T22:35:34+5:30

अखाद्य बर्फाची सर्रास विक्री

Summary | सारांश

सारांश

ाद्य बर्फाची सर्रास विक्री
नागपूर : शहरात पंधराच्यावर बर्फ निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. खाद्य बर्फ तयार करताना मिनरल वॉटरचा वापर करण्याचा नियम आहे, मात्र कंपन्या विहीर व बोअरवेलच्या पाण्याचा सर्रास वापर करून अखाद्य बर्फ तयार करीत आहेत. अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तर आपल्याकडे तयार होणारा बर्फ अखाद्य की खाद्य याची माहितीच नाही. ग्राहकही याची विचारणा न करताच बर्फ खरेदी करीत असल्याने शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.

इतवारीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत!
नागपूर: अन्न-धान्य, कपडे, सोन्या-चांदीच्या सर्व प्रकारची बाजारपेठ असलेल्या इतवारीत दिवसाकाठी विविध कामानिमित्त हजारो लोक येतात. मात्र अवैध पार्किंग, रस्त्यावर अतिक्रमण व कुठेही उभे राहणाऱ्या फेरीवाल्यांची समस्या आजही कायम आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणाऱ्या उपाययोजनेवरच प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

डासांचा प्रादुर्भाव
नागपूर : हनुमानगर झोन अंतर्गत येणाऱ्या राजाबाक्षात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे, टीबी वॉर्डाच्या मैदानात असलेल्या सार्वजनिक विहिरचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. या संदर्भात तक्रार करूनही उपाययोजना नाही. महापौर प्रवीण दटके यांनी याकडे लक्ष देऊन डासांचा प्रादुर्भाव थांबवावा सोबतच या वसाहतीत फॉगिंग करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पाण्याचा अपव्यय
नागपूर : सरदार वल्लभभाई पटेल चौकातून झाटतरोडीकडे जाणाऱ्या मार्गावर मागील पाच दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. मनपाच्या आयसोलेशन रुग्णालयासमोर नळ लाईन फुटली आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाला याची माहिती असतानाही उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरटीओत पार्किंगची समस्या
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्यासमोर शेकडो ऑटोरिक्षांनी जागा व्यापली आहे. परिणामी कार्यालयात येणाऱ्या वाहन कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या अनेक ऑटोरिक्षांचे चाकांसह इतर साहित्य गायब झाले आहे. सध्या याला भंगाराचे स्वरुप आले आहे.

Web Title: Summary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.