सारांश-१

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:18+5:302015-02-06T22:35:18+5:30

Summary -1 | सारांश-१

सारांश-१

> सारांश

रावसाहेब दानवे यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर : केंद्रीय राज्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपूर दौऱ्यात दीक्षाभूमीला भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
याप्रसंगी महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, शहराध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम, प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.

हिंगणा येथे भाजपा सदस्य अभियान आढावा बैठक

नागपूर : आ. समीर मेघे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणा येथे भाजपा सदस्यता अभियान आढावा बैठक घेण्यात आली. हिंगण्यात ५० हजार सदस्य बनविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. बैठकीला आनंदराव कदम, मधुकरराव पारधी, आकाश वानखेडे, रूपराव शिंगणे, बबलू गौतम, संध्या गोतमारे, विठ्ठलराव कोहाड, अंबादास उके, सुधाकर ढोणे, शीला भोयर, भैय्याजी कुंभरे आदी उपस्थित होते.

मनपा आयुक्तांना काँग्रेसचे निवेदन

नागपूर : शहरातील विविध मागण्यांसदर्भात नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे एका शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आधार कार्डसाठी शिबिर लावण्यात यावे, शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे करण्याची परवानगी देऊ नये, आदी अनेक मागण्यांचा समावेश होता. नगरसेवक योगेश तिवारी आणि जॉन थॉमस यांनी नेतृत्त्व केले.

सनातन धर्मरथचे प्रदर्शन

नागपूर : सनातनचे अनमोल ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लक्ष्मीनगर आठ रस्ता चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वैदिक विश्व संस्थेचे विजयराव देवधर यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन शहरात भगवती मंदिर यशवंत स्टेडियम, गजानन महाराज मंदिर लाकडी पूल, महाल येथे भरविण्यात येणार आहे.

Web Title: Summary -1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.