सारांशसाठी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:12+5:302015-01-23T23:06:12+5:30
उद्या राष्ट्रीय मतदार दिवस

सारांशसाठी
उ ्या राष्ट्रीय मतदार दिवसनागपूर: रविवारी २५ जानेवारी रोजी स. ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.-०-०-०-नेताजी सुभाषचंद्र बोसजयंतीनागपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त आप्पासाहेब धुळाज, एन.पी. मित्रागोत्री, एम.ए.एच खान उपस्थित होते.-०-०-०-०-०सामाजिक न्यायमंत्री येणारनागपूर : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे शनिवारी २४ जाने.ला स.६.१० वा. नागपूर येथे आगमन होणार असून ते दुपारी ११ वा. रविभवन येथे बैठक घेणार आहेत. त्यानंतर दु. १ वा. ते अर्जुनी -मोरगावकडे रवाना होतील.-०-०-०-०-मुनगंटीवार घेणार बैठकनागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार २४ जानेवारीला स. ७.२५ वा. मुंबईहून नागपूरमध्ये येणार असून ते स. ११ वा. भाजपच्या विभागीय कार्यालयात बल्लारपूर भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना होतील.-०-०-०-रस्ता दुभाजकाचे काम नागपूर: अमरावती मार्गावर विद्यापीठ परिसराच्या पुढे रस्ता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता दुभाजक नसल्याने या भागातील वाहतूक अनियंत्रित होती. अपघात होण्याचाही धोका होता.